महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Maharashtra Corona Update : राज्यात आज ४१४५ नवे रुग्ण, तर १०० रुग्णांचा मृत्यू

आज राज्यात ४१४५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी २०८, शुक्रवारी १५८, शनिवारी १३४, रविवारी १३० मृत्यूची नोंद झाली होती. सोमवारी त्यात घट होऊन १०० कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

maharashtra corona patient numbers
maharashtra corona patient numbers

By

Published : Aug 16, 2021, 8:26 PM IST

मुंबई -राज्यात शनिवारी कोरोनाचे ५,७८७ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. रविवारी त्यात घट होऊन ४,७९७ नव्या रुग्णांची नोंद झाली. आज त्यात आणखी घट होऊन ४१४५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर गुरुवारी २०८, शुक्रवारी १५८, शनिवारी १३४, रविवारी १३० मृत्यूची नोंद झाली आहे. आज सोमवारी त्यात घट होऊन १०० मृत्यूची नोंद झाली आहे.

५८११ रुग्णांना डिस्चार्ज -

राज्यात गुरुवारी ५८११ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर राज्यात आजपर्यंत एकूण ६१,९५,७४४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८६ टक्के एवढे झाले आहे. मंगळवारी राज्यात ४१४५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १०० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. तर आतापर्यंत एकूण १,३५,१३९ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,११,११,८९५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,९६,८०५ (१२.५३ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,५३,१२९ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ६२,४५२ सक्रिय रुग्ण आहेत.

मृत्यूदर २.११ टक्के -

१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७, ७ ऑगस्टला १२८, ८ ऑगस्टला १५१, ९ ऑगस्टला ६८, १० ऑगस्टला १३७, ११ ऑगस्टला १६३, १२ ऑगस्टला २०८, १३ ऑगस्टला १५८, १४ ऑगस्टला १३४, १५ ऑगस्टला १३०, १६ ऑगस्टला १०० मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्यूदर २.११ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.

या विभागात सर्वाधिक रुग्ण -

  • मुंबई - १९५
  • रायगड - ५१
  • पनवेल पालिका - ५०
  • अहमदनगर - ६६०
  • पुणे - ४२६
  • पुणे पालिका - १४९
  • पिपरी चिंचवड पालिका - ९६
  • सोलापूर - ५८४
  • सातारा - ५३८
  • कोल्हापूर - १९५
  • सांगली - ३६४
  • सांगली मिरज कुपवाडा पालिका - ४४
  • सिंधुदुर्ग - १००
  • रत्नागिरी - ११५
  • उस्मानाबाद - ६३
  • बीड - ९०

हेही वाचा - Delta Plus Variant : राज्यात डेल्टा प्लसच्या रुग्णांची संख्या ७६, रॅपिड रिस्पॉन्स टीमची स्थापना

ABOUT THE AUTHOR

...view details