मुंबई -मुंबईत डिसेंबर महिन्यापासून ( Corona Thired Wave In Mumbai ) कोरोना विषाणूची तिसरी लाट आली आहे. जानेवारीच्या सुरुवातीला ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारांच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होऊन २०० ते ३०० रुग्ण आढळून येत होते. आज रविवारी त्यात घट होऊन १६७ नव्या रुग्णांची ( Today Corona Patient In Mumbai ) नोंद झाली आहे. मंगळवार, बुधवार, गुरुवार असे सलग तीन दिवस शून्य मृत्यूची नोंद झाली होती. आज रविवारीदेखील शून्य मृत्यूची ( Todays Corona Death In Mumbai ) नोंद झाली आहे. मुंबईत आतापर्यंत 13 वेळा शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. मुंबईत सध्या रुग्ण बरे होण्याचा दर ९८ टक्के असून १५११ सक्रिय रुग्ण आहेत.
१६७ नव्या रुग्णांची नोंद -
मुंबईत गेले दोन वर्षे कोरोनाचा प्रसार आहे. या दरम्यान कोरोनाच्या दोन लाटा आल्या. त्या दोन्ही लाटा थोपवण्यात पालिकेला यश आले आहे. पहिल्या लाटे दरम्यान २८०० तर दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोनाचे ११ हजार ५०० सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली होती. डिसेंबर महिन्यात कोरोनाची तिसरी लाट आली असून ६ ते ८ जानेवारीदरम्यान सलग तीन दिवस २० हजारच्यावर रुग्ण आढळून आले. त्यानंतर रुग्णसंख्येत घट होताना दिसत आहे. मुंबईत आज (२० फेब्रुवारीला) १६७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर शून्य मृत्यूची नोंद झाली आहे. आज २८६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत एकूण १० लाख ५५ हजार ५६१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी १० लाख ३४ हजार ४९३ रुग्ण बरे झाले आहेत. तर १६ हजार ६८७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या १५११ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८ टक्के तर रुग्ण दुपटीचा कालावधी ३०९७ दिवस इतका आहे. मुंबईत एकही इमारत झोपडपट्टी सील नाही. १३ फेब्रुवारी ते १९ फेब्रुवारी या कालावधीत कोरोना वाढीचा दर ०.०२ टक्के इतका आहे.
९७.७ टक्के बेड रिक्त -