महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

अतिवृष्टीची शक्यता, कर्जत तालुक्यातील 8 कुटुंबांचे स्थलांतर - महाराष्ट्र कोरोना लसीकरण

todays-big-breaking-news
todays-big-breaking-news

By

Published : Jun 9, 2021, 6:30 AM IST

Updated : Jun 9, 2021, 10:05 PM IST

22:00 June 09

अतिवृष्टीची शक्यता, कर्जत तालुक्यातील 8 कुटुंबांचे स्थलांतर

रायगड - जिल्ह्यात होणाऱ्या अतिवृष्टीची शक्यता लक्षात घेता प्रशासन अलर्ट झाले असून, कर्जत तालुक्यातल्या मुद्रे येथील आठ कुटुंबांचे सुरक्षीत जागी स्थलांतर करण्यात आले आहे.

20:22 June 09

पावसामुळे ठप्प झालेली लोकल सेवा पुन्हा सुरू

मुंबई - मुंबईत कालपासून पावसाला सुरुवात झाली आहे. आज दिवसभर पाऊस कोसळत होता. पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचले, याचा परिणाम लोकलवर देखील झाल्याचे पाहायला मिळाले. पावसाचा जोर वाढल्याने लोकल सेवा ठप्प झाली होती. मात्र आता पावसाने विश्रांती घेतल्याने लोकल सेवा पुन्हा एकदा सुरू झाली आहे. तब्बल साडेनऊ तासांनी लोकल सेवा पुन्हा सुरू झाली आहे. 7 वाजून 46 मिनिटांनी टिटवाळाकडे लोकल रवाना झाली.

19:10 June 09

मुंबईत सलग 12 तास पाऊस

मुंबईत सलग 12 तास पाऊस पडला आहे. सकाळी 5 ते सायंकाळी 5 असा तब्बल 12 तास पाऊस झाला. दरम्यान शहरी विभागत 137.82 मिलिमीटर, पश्चिम उपनगरात 190.78 मिलिमीटर, तर पूर्व उपनगरात 214.44 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. पावसामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

19:07 June 09

विदर्भात मान्सूचे आगमन, 8 दिवस आधीच झाला दाखल

विदर्भासाठी दिलासादायक बातमी आहे. साधारणतः १५ जूननंतर दाखल होणारा मान्सून यंदा तब्बल आठ दिवस आधीच विदर्भात दाखल झाला आहे, अशी माहिती प्रादेशिक हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. 11 ते 13 जूनदरम्यान मुसळधार पावसाचा आंदाज देखील हवामान खात्याने वर्तवला आहे.

18:13 June 09

ठाण्यात मुसळधार पावसाला पुन्हा सुरुवात

ठाण्यात पुन्हा एकदा मुसळधार पावसाला सुरुवात झाली आहे. मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे लोकलसेवा विस्कळीत झाली आहे. लोकसेवा बंद असल्यामुळे अनेक जण स्टेशनवरच अडकले आहेत.

13:21 June 09

तोट्यातील एसटी महामंडळाला 600 कोटींची मदत

एसटी कर्मचाऱ्यांचे थकीत वेतन मिळणार, राज्य शासन एसटी महामंडळाला देणार ६००कोटी रुपयांचे आर्थिक मदत


 

13:15 June 09

मुंबईत पावसाची जोरदार बॅटिंग, महापौर किशोरी पेडणेकर यांनी घेतला आढावा

मुंबई आज मान्सून च्या पावसाने दमदार हजेरी लावली. यंदाच्या पहिल्याच पावसात मुंबई शहर जलमय झाले. मुंबईची तुंबई झाल्यानंतर महापौरांनी आढावा घेतला आहे. पालिकेच्या आपत्कालील व्यवस्थापन विभागाला भेट दिल्यानंतर  मुंबईत पाणी साचणार नाही असं कधीच बोलले नसल्याचे महापौैर म्हणाल्या आहेत.

13:00 June 09

मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ रुग्णालयात भरती; श्वास घेण्यास त्रास

12:45 June 09

कोकण रेल्वेच्या इलेक्ट्रिफिकेशन डब्यात लागली आग; कोकण रेल्वेच्या झाराप-कुडाळ स्थानकादरम्यानची घटना

12:40 June 09

माजी केंद्रीय राज्यमंत्री, काँग्रेस नेते जितीन प्रसाद आज भाजपमध्ये प्रवेश करणार

माजी केंद्रीय राज्यमंत्री, काँग्रेस नेते जितीन प्रसाद आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. युपीच्या निवडणुका समोर ठेऊन हा प्रवेश केला जात असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा. भाजपा अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत करणार प्रवेश
 

12:06 June 09

मध्य प्रदेशातील भाजपा सरकारमध्ये कोणतेही नाराजी नाट्य नाही - गृहमंत्री मिश्रा

भाजपामध्ये कोणतीही नाराजी नाही.  संपूर्ण पक्ष मुख्यमंत्री शिवराज सिंह आणि वी. डी. शर्मा यांच्या नेतृत्वात एकत्र उभा आहे. राज्यात नेतृत्व बदलाबाबत होणाऱ्या चर्चावर मध्य प्रदेश गृह मंत्री नरोत्तम मिश्रा यांनी स्पष्टीकरण दिले आहे

12:02 June 09

शेतकरी नेते राकेश टिकेत प बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींची घेणार भेट

शेतकरी नेते राकेश टिकेत आज कोलकातामध्ये मुख्यमंत्री ममता बनर्जी यांची भेट घेणार आहेत. तसेच बंगालमधील शेतकरी संघटनेच्या नेत्यांशी आणि कार्यकर्त्यांशी ते चर्चा करणार आहेत.  त्याचबरोबर केंद्राच्या तीन कृषी कायद्याविरोधात केंद्र सरकारला पत्र लिहण्यासंदर्भात ममता यांच्याशी चर्चा करणार असल्याचे टिकेत यांनी सांगितले.

11:59 June 09

भाजपा आमदार आणि पश्चिम बंगाल विधानसभेचे विरोधी पक्षनेते शुवेंदु अधिकारी आज पंतप्रधान मोदींची घेणार भेट, पंतप्रधान कार्यालयात झाले दाखल
 

11:50 June 09

किनारपट्टी भागात आज कोसळणार मुसळधार पाऊस

बुधवारी सकाळी साडेअकरावाजताच्या समारास किनारपट्टीवर सातत्याने उंच ढगांची निर्मिती होत आहे. अशा स्थितीत पालघर ते सिंधुदुर्गदरम्यान दिवसभर पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. पुढील ४ तास पालघर, ठाणे, मुंबई, रायगडमध्ये अनेक ठिकाणी मध्यम ते मुसळधार सरी कोसळणार असल्याचा अंदाच वेध शाळेने वर्तवला आहे.


 

11:16 June 09

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी उत्तर प्रदेशातील अपघातातील मृतांबद्दल शोक व्यक्त केला

कानपूरमध्ये झालेल्या रस्ते अपघातामध्ये मृत्यू झालेल्या नागरिकांप्रति राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शोक व्यक्त केला. तसेच जखमी लवकर बरे व्हावेत यासाठी प्रार्थना देखील केली

11:13 June 09

रायगड जिल्ह्यात ११ आणि १२ जूनला मुसळधार पावसाचा इशारा -

१२ जूनला मुंबई, रायगड, ठाणे, रत्नागिरी, पालघर, सिंधुदुर्ग या जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान विभागाच्या मुंबई वेधशाळेकडून देण्यात आला आहे.

10:56 June 09

सीएसएमटी ते कुर्ला, वाशी दरम्यान लोकल सेवा बंद

रेल्वेच्या हार्बर मार्गावरील सीएसएमटी ते वाशी दरम्यानची लोकलसेवा सकाळी १.२० पासून बंद करण्यात आली आहे. रेल्वे मार्गावर मोठ्याप्रमाणात पाणी साचले आहे. पहिल्याच पावसात मुंबईची वाहतूक व्यवस्था प्रवभावित झाली आहे. कसारा बीएसयू ठाणे या मार्गावरील लोकल सेवा धिम्या गतीने सुरू आहे.

10:55 June 09

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसंदर्भात आज मुंबई भाजपाची बैठक दादर वसंत स्मृती कार्यालयामध्ये सुरू आहे. या बैठकीला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजपचे राष्ट्रीय संघटन मंत्री बी एल संतोष, भाजपचे महाराष्ट्र प्रभारी सि टी रवी, विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस,प्रवीण श्रीकांत भारतीय, आमदार अतुल भातखळकर, शेलार,अमित साटम,मंगल प्रभात लोढा हे सर्व भाजपचे नेते या बैठकीला उपस्थित आहेत..

10:53 June 09

राज्याच्या मदतीसाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते; मी पक्षवाढीसाठी राज्यभर फिरतोय - संजय राऊत

- राज्याला मदत मिळावी यासाठी मुख्यमंत्री दिल्लीला गेले होते...

- सकारात्मक दृष्टीने या भेटीकडे पाहायला हवे, मेट्रो शेड अडकलीये,त्याबाबत सकारात्मक चर्चा झाली आहे.  

- या राज्याच्या विरोधी पक्षाने या भेटीचं स्वागत करायला हवे.

- विरोधी पक्षाला नेण्याने राज्याला जर मदत मिळत असेल तर तसे केंद्राने जाहीर करावे.

- त्यांच्याच पक्षाचं केंद्र सरकार आहे, विरोधी पक्ष नेते जाणकार आहेत, या बाबत विरोधी पक्षाने मुख्यमंत्र्यांना सल्ला आणि सुचना द्यायला हव्या.

- राज्याच्या प्रश्नांवर जर भाजप चिंतन करत असेल तर त्यांच्या बैठकीचं स्वागत आहे...

- पक्ष वाढवणं गरजेचं आहे... त्यासाठी माझा दौरा सुरू आहे... इतर गोष्टी होत राहतील.

10:17 June 09

कुर्ला, सायन मध्ये रेल्वे रुळावर पाणी, सीएसटीकडे जाणारी वाहतूक बंद

मुंबईत मान्सूनचे आगमन झाल्यानंतर आज मुसळधार पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे मुंबतील बहुतांशी सखल भागात पाणी साचले आहे. परिणामी सायनमघ्ये रेल्वे रुळावर मोठ्याप्रमाणात पाणी साचले असल्याने सीएसएमटीकडे जाणारी लोकल रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. पाणी कमी झाल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरु करण्यात येणार असल्याचे रेल्वेच्या जनसंपर्क अधिकाऱ्यांनी माहिती दिली.

10:11 June 09

मुंबईतील नेताजी पालकर चौक, एसव्ही रोड,सक्कर पंचायत, नीलम जंक्शन,गोवंडी, हिंदमाता,  धारावी, सायन जंक्शन किंग्ज सर्कल भागात पावसाचे पाणी साचले आहे. वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे,.
 

09:46 June 09

रायगडमध्ये पावसाची रिपरिप सुरू, दोन दिवस मुसळधार पावसाचा इशारा

रायगड - जिल्ह्यात पहाटेपासून पावसाची रिपरिप सुरू, शेतीच्या कामांना वेग, जनजीवन विस्कळीत

09:23 June 09

मान्सूनच्या पावसाने मुंबईतील सायन भागात भरले पाणी; वाहन चालकांची तारांबळ

मुंबईत पावसामुळे सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात

- हिंदमाता

- किंग सर्कल

- सायन  

येथे पाणी साचले 

सायन रेल्वे ट्रॅकवर पाणी साचले

लोकलची वाहतूक संथ गतीने

09:06 June 09

पश्चिम किनारपट्टी भागात मुसळधार पावसाचा इशारा

पश्चिम किनारपट्टीवर मोठ्याप्रमाणात ढगांची दाटी झाली आहे. मुंबई ठाणे रायगड या ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. मुंबईत सध्या मान्सूनच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे.

08:58 June 09

मान्सूनचे मुंबईत दमदार आगमन, पहाटेपासूनच बरसायला सुरुवात

राज्यात दाखल झालेला मान्सून आज मुंबईत दाखल झाला. मुंबईच्या हवामान विभागाकडून याबाबतची माहिती देण्यात आली. प्रतिवर्षी मान्सून १० जूनला मुंबईत दाखल होतो. यंदा मात्र, मान्सूनने मुंबईत एक दिवस आधीच हजेरी लावली आहे. आज पहाटेपासून मुंबईसह उपनगरात मान्सून पावसाच्या जोरदार सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. मान्सूनच्या आगमनाने मुंबईकरामध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

08:16 June 09

नागपुरातील महात्मा फुले मार्केटमध्ये नागरिकांची तुफान गर्दी; कोरोनाचे भय संपले?

 नागपूर मधील नागरिकांमध्ये कोरोना आजाराचे भय उरले नसल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. येथील महात्मा फुले भाजी मार्केटमध्ये नागरिकांनी आज सकाळी मोठ्याप्रमाणात गर्दी केली आहे. राज्यात सध्या पाच स्तरामध्ये विविध जिल्ह्यात लॉकडाऊनमध्ये शिथिलता देण्यात आळी आहे. मात्र, अशा प्रकारची गर्दी वाढत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव आणखी वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही.


 

07:27 June 09

डॉक्टरांवरील हल्ले थांबवा; त्यांचा आदर करा- काँग्रेस नेते शशी थरूर

06:08 June 09

मुंबईत हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायावर छापा

मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने वर्सोवा येथील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या हाय प्रोफाईल वेश्याव्यवसायावर छापा टाकला. यामध्ये २ मॉडेलची सुटका करण्यात आली आहे. तर एका महिलेस अटक करण्यात आली आहे.

Last Updated : Jun 9, 2021, 10:05 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details