महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आंदोलन निश्चित..! मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही -संभाजीराजे छत्रपती - शिवकालीन होन

todays big breaking news
todays big breaking news

By

Published : Jun 6, 2021, 6:40 AM IST

Updated : Jun 6, 2021, 1:09 PM IST

13:08 June 06

पुण्यात मान्सून दाखल, अलिबागपर्यंत पोहोचला

मॉन्सून पुण्यात दाखल झाला. मान्सून प्रगतीची उत्तरसीमा किनारपट्टीवर अलिबागपर्यंत पोहोचली आहे. काल रात्री पडलेला पाऊस मॉन्सूनचा होता यावर आयएमडीचे शिक्कामोर्तब 

12:25 June 06

त्या मराठा कार्यकर्त्यांवर, मावळ्यांवर गुन्हे दाखल करू नका- नरेंद्र पाटील

खासदार छत्रपती संभाजी महाराजांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन अनेकांनी रायगड जाणे रद्द केले.परंतु काही मावळे आधीच रायगडी दाखल झाले होते.ते फक्त छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करायला तिथे गेले आहेत,त्यामुळे प्रशासनाने त्यांचावर गुन्हे दाखल करू नये, अशी विनंती माथाडी कामगार संघटनेचे नेते आणि अखिल भारती मराठा महासंघाचे नेते नरेंद्र पाटील यांनी सरकारकडे केली आहे.

12:06 June 06

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कृषी क्षेत्रावर परिणाम होणार नाही- निती आयोग

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा कृषी क्षेत्रावर कोणाताही परिणाम होणार नसल्याचे मत निती आयोगाचे कृषी क्षेत्राशी निगडीत सदस्य रमेश चंद यांनी व्यक्त केले आहे.

10:59 June 06

मराठा आरक्षणासाठी १६ जूनला कोल्हापुरात होणार पहिले आंदोलन - संभाजीराजे छत्रपती

10:49 June 06

मराठा समाजाला आरक्षण मिळायलाच पाहिजे, अन्याय नको - संभाजीराजे छत्रपती

लोकप्रतिनिधी पगार घेतात, त्यांनी लोकांची कामे करायलाच हवी. मी मराठा समाजासाठी लढणार

आंदोलन निश्चित..! मराठा समाजाला न्याय दिल्याशिवाय गप्प बसणार नाही

मराठा समाजाला अडवू नका, कोरोना संपल्यानंतर तुम्ही निर्णय घेतला नाही.... आम्ही मुंबईत धडकणार

संभाजीराजांवर तुम्हाला पहिली लाठी चालवावी लागेल, मराठा समाजाला गृहित धरू नका

10:05 June 06

सिने अभिनेते दिलीपकुमार यांना हिंदुजा रुग्णालयात केले दाखल

सिने अभिनेते दिलीपकुमार यांना हिंदुजा रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. त्यांना आज सकाळच्या सुमारास श्वसनाचा त्रास होऊ लागला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

10:02 June 06

महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण; मुख्यमंत्र्यांकडून शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा

युगप्रवर्तक, स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांना शिवराज्याभिषेक दिनानिमित्त मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी त्रिवार मुजरा केला. महाराष्ट्राच्या हृदयावर कोरलेला हा सुवर्ण क्षण आहे, असे सांगून त्यांनी राज्यातील जनतेलाही शिवराज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

07:35 June 06

मुंबईत शनिवारी रात्रीपासून पावसाच्या सरी

06:51 June 06

लष्कराने उधळला दहशतवाद्यांचा शस्त्र तस्करीचा डाव

जम्मू काश्मीरमध्ये भारतीय सुरक्षा दलाच्या जवानांनी कुलगाम जिल्ह्यात दहशतवाद्यांचा शस्त्र तस्करीचा डाव उधळला आहे. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये दोन एके 56 राइफल (AK 56), 10 पिस्तुल, ग्रेनेड आणि दारु गोळा हस्तगत करण्यात आला

06:48 June 06

93 माजी अधिकाऱ्यांचे पंतप्रधानांना पत्र; लक्षद्वीपप्रश्नी केली चिंता व्यक्त

 93 माजी अधिकाऱ्यांनी पंतप्रधान मोदींना लक्षद्वीपमधील परिस्थितीशी संबंधित चिंता व्यक्त करणारे पत्र लिहले आहे. या पत्रावर माजी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार शिवशंकर मेनन, प्रसार भारतीचे सीईओ जवाहर सरकार यांच्याही सह्या आहेत

06:42 June 06

पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यालयजवळ आढळले ५४ क्रूड बॉम्ब

पश्चिम बंगालमध्ये भाजपा कार्यालयाच्या बाहेर तब्बल ५४ क्रूड बॉम्ब सापडले आहेत. या घटनेची माहिती मिळताच बॉम्ब शोध व नाशक पथकाने घटनास्थळी जाऊन ते हस्तगत केले आहेत. शनिवारी रात्री हे बॉम्ब हस्तगत करण्यात आले आहेत. 

06:33 June 06

यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा अत्यंत दुर्मिळ व अमूल्य अशा ऐतिहासिक शिवकालीन 'होन' च्या साक्षीने साजरा होणार..

06:26 June 06

मराठा आरक्षणाची दिशा जाहीर, कोल्हापुरातून राजर्षी शाहू महारांजाच्या समाधीस्थळापासून आंदोलन सुरू

आज रायगडावर ३४८ वा शिवराज्याभिषेक सोहळा

रायगड -  महाराष्ट्राचे अराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा 348 वा शिवराज्याभिषेक दिन सोहळा आज किल्ले रायगडावर साजरा होत आहे. शिवराज्याभिषेकापूर्वी रायगडावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. कोल्हापूरचे संभाजीराजे छत्रपती यांच्या उपस्थितीत राज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने हा सोहळा संपन्न होणार आहे. कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर मोजक्याच लोकांना गडावर या सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

Last Updated : Jun 6, 2021, 1:09 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details