पुणे जमीन घोटाळा प्रकरणात एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात मुंबई सत्र न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी केला आहे. मंदाकिनी खडसेंनी दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. दरम्यान, या प्रकरणी एकनाथ खडसे हे आजही सत्र न्यायलयात हजर होऊ शकले नाही. खडसेंची सर्जरी झाली असून ते सध्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये दाखल आहेत. अजून काही दिवस ते रुग्णालयातच राहणार असल्याचे त्यांच्या वकिलांनी कोर्टात सांगितले आहे. तसेच हजर राहण्यासाठी कोर्टाकडे आणखी वेळ मागितला आहे. न्यायालयाने खडसेंना उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ दिला आहे. दरम्यान, या प्रकरणी पुढील सुनावणी आता 21 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
BIG BREAKING : एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी - ताज्या घडामोडी
17:48 October 12
एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंविरोधात अजामीनपत्र वॉरंट जारी
17:15 October 12
प्रत्येक जिल्ह्यात अँटी नार्कोटिक्स सेलची स्थापना करणार - दिलीप वळसे-पाटील
- प्रत्येक जिल्ह्यात अँटी नार्कोटिक्स सेलची स्थापना करणार - गृहमंत्री
- ग्रामीण भागातही सुद्धा ड्रग्सचा नायनाट करण्यात येईल - गृहमंत्री
17:07 October 12
देशांतर्गत पूर्ण क्षमतेने विमानांच्या उड्डाणास परवानगी
18 ऑक्टोबरपासून देशांतर्गत विमान उड्डाणे कोणत्याही प्रतिबंधांशिवाय पूर्ण क्षमतेने सुरू करण्यास नागरी उड्डयन मंत्रालयाने परवानगी दिली आहे.
17:07 October 12
दिल्लीत पाकिस्तानी दहशतवाद्याला अटक
दिल्लीतील लक्ष्मी नगर भागातून मोहम्मद अश्रफ या पाकिस्तानी दहशतवाद्यास अटक करण्यात आली आहे. त्याला 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
13:36 October 12
- 2 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी कोव्हॅक्सिनला मंजूरी देण्यात आली आहे.
13:05 October 12
- पार्थ पवार यांच्या कार्यालयावर सहाव्या दिवशीही आयकर विभागाचे छापे
- मुंबईतील नरिमन पॉइंट येथील कार्यालयावरही छापा
- पार्थ पवार यांच्या अनंता मर्क्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीवरही छापा
- पार्थ पवार यांच्या व्यतिरिक्त आहेत इतर दोन भागीदार
12:52 October 12
- अंबरनाथ आनंद नगर एमआयडीसीतील आर के केमिकल या कंपनीत रासायनिक वायू गळती
- शेजारील कंपनीतील 15 कामगारांना उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी करण्यात आले दाखल
12:19 October 12
- क्रुझ ड्रग्स प्रकरणात चित्रपट निर्माते इम्तियाज खत्री यांना चौकशीसाठी पुन्हा एनसीबी कार्यालयात बोलवण्यात आले आहे. शनिवारी एनसीबीने त्यांची सुमारे 8 तास चौकशी करण्यात आली होती. याआधी क्रूज ड्रग्स प्रकरणात एनसीबीने इम्तियाज खत्री ह्यांच्या ठिकाणांवर छापेमारी केली होती.
12:14 October 12
कोळशाच्या तुटवड्यावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली प्रतिक्रिया....
- केंद्रासरकरच्या कंपनीने कोळसा उचल करण्याचे सांगितले असताना कोळश्याची उचल केली नाही.2800 कोटी रुपये कोळसा कंपनींचे थकीत आहे. पण सरकार पैसे देण्यास तयार नाही, त्यामुळे राज्यावर कोळसा संकट आले, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.
09:16 October 12
- कालच्या महाराष्ट्र बंदमध्ये शिवसैनिक एका रिक्षा चालकाला दमदाटी आणि मारताना विडिओ व्हायरल झाला होता. त्यासंदर्भात आज पाच जणांवर ठाणे नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माजी नगरसेवक पवन कदम, माजी नगरसेवक गिरीश राजे तसेच किरन नाक्ती, प्रकाश पायरे, महेंद्र मढवी आदींचा समावेश आहे.
09:06 October 12
- आज राष्ट्रवादीच्या महत्त्वाच्या नेत्यांची बैठक
- शरद पवारांची उपस्थिती
- सायंकाळी पाच वाजता यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे होणार बैठक
- मंत्र्यांच्या कामाचा आढावा घेण्यासाठी बैठकीचे आयोजन
- अजित पवार त्यांच्या नातेवाईकांवर आणि अनिल देशमुखांच्या कुटुंबियावरील कारवाईवर चर्चा होण्याची शक्यता
06:13 October 12
Breaking News
जम्मू आणि काश्मीर -शोपियांनमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले होते. यापैकी एकाची ओळख पटली असून तो मुख्तार शाह, असे या दहशतवाद्याचे नाव आहे. तो काही दिवसांपूर्वी बिहारमधील एका फेरीवाल्याची हत्या करुन शोपियांमध्ये स्तलांतर झाला होता, अशी माहिती काश्मीरचे आयजीपी विजय कुमार यांनी दिली.