आज दिवसभरात/आजपासून -
- राज्यात गणेशोत्सवाचा दुसरा दिवस, सरकार कोरोना निर्बंधांबाबत नवीन निर्णय घेण्याची शक्यता
- कर्नाल एसडीएम प्रकरणात आज सकाळी 9 वाजता शेतकरी आणि सरकार यांच्यात पुन्हा बैठक
- प्रियांका गांधी वाड्रा काँग्रेसच्या निवडणूक समितीसोबत बैठक घेणार आहेत
- दिल्ली-एनसीआरमध्ये आज मुसळधार पावसाची शक्यता, हवामान विभागाचा हाय अलर्ट जारी
- प्रतिरोध शक्तीने पंजशीरच्या परियान, अबशार आणि दारा जिल्ह्यांवर मिळवला विजय
- कर्नालमधील मिनी सचिवालयासमोर सकाळी 11 पासून शेतकऱ्यांची महापंचायत
- तालिबान 9/11 च्या वर्धापनदिनानिमित्त शपथविधी समारंभ आयोजित करू शकतो
- तेलंगणामध्ये आजपासून ड्रोन वितरण सुरू
- उत्तर प्रदेशात निवडणुकीची तयारी सुरू, भाजपच्या आज होणार बैठका
- नागपूर मनपाच्या सर्व लसीकरण केंद्रांवर कोव्हिशिल्डचे 18 व 45 वर्षावरील नागरिकांसाठी लसीकरण सुरू राहिल. तर कोव्हॅक्सिनचे 18 व 45 वर्षावरील नागरिकांसाठी नमूद केंद्रांवर लसीकरण सुरू राहिल.
- लालबागचा राजाचे ॲानलाईन दर्शन भाविकांसाठी १९ सप्टेंबर रोजी सकाळी ७:०० वाजेपर्यंत २४ तास चालू राहिल. या उत्सवाचे थेट प्रक्षेपण मंडळाच्या अधिकृत सोशल मिडिया साईटवर उपलब्ध असेल.
- पंतप्रधान नरेंद्र मोदी २६ सप्टेंबर २०२१ रोजी आकाशवाणीवरील मन की बात कार्यक्रमामधून देश-विदेशातील लोकांना संबोधित करणार आहेत. नागरिक आपले विचार NamoApp किंवा MyGov या मुक्त मंचावर मांडू शकतात. आपण आपला संदेश १८००-११-७८०० या टोल फ्री क्रमांकावर देखील नोंदवू शकता.
- महान समाज सुधारक आणि भूदान तसंच सर्वोदय चळवळींचं नेतृत्व करणारे आचार्य विनोबा भावे यांची आज 126 वी जयंती.
- आज तामिळ अभिनेत्री श्रीया शरण आणि क्रिकेटपटू मुरली कार्तिकचा वाढदिवस