मुंबई -मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आहे. गेल्या अकरा महिन्यात करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोना आटोक्यात आला आहे. मुंबईत 300 ते 400 रुग्ण आढळून येत होते मात्र फेब्रुवारी महिन्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. गेले चार ते पाच दिवस मुंबईत एक हजाराच्या वर रुग्ण आढळून आले होते. त्यात काल किंचितशी घट झाली. काल 855 रुग्ण आढळून आले होते. आज पुन्हा 849 रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत सलग दुसऱ्या दिवशी आठशेच्या वर रुग्ण आढळून आले आहेत.
कोरोना रुग्णांची आकडेवारी -
मुंबईत आज 849 रुग्ण आढळून आल्याने कोरोनाग्रस्तांचा आकडा 3 लाख 27 हजार 619 वर पोहचला आहे. आज 2 जणांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 11 हजार 476 वर पोहचला आहे. 903 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 3 लाख 5 हजार 639 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 9633 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 242 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 11 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 145 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आतापर्यंत 33 लाख 10 हजार 190 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
हे विभाग हॉटस्पॉट -