मुंबई -ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून पुन्हा रुग्ण संख्या आटोक्यात आली. मात्र, आता पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. गेल्या आठवडाभरात त्यात दुप्पटीहून अधिक वाढ झाली. आज मुंबईत नवे 800 रुग्ण आढळून आले असून 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
सध्या मुंबईत 10 हजार 687 सक्रिय रुग्ण
मुंबईत आज (सोमवारी) कोरोनाचे 800 नवे रुग्ण आढळून आले असून 14 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 12 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 9 पुरुष तर 5 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 76 हजार 507 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 687 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 382 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 52 हजार 499 वर गेला आहे. सध्या मुंबईत 10 हजार 687 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 233 दिवसांवर -