मुंबई -मुंबईत आज 798 नवे रुग्ण आढळून आले असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईत मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. ऑक्टोबर महिन्यापासून रुग्ण संख्या आटोक्यात आली. त्यानंतर पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली. 16 नोव्हेंबरला रुग्ण संख्या 409 पर्यंत खाली आली होती. गेले काही दिवस रुग्ण संख्येत वाढ झाली होती. मात्र, आता पुन्हा काही प्रमाणात रुग्णांच्या संख्येत घट होत आहे.
रुग्ण, मृत्यूंची आकडेवारी -
मुंबईत आज (गुरूवारी) कोरोनाचे 798 नवे रुग्ण आढळून आले असून 13 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 6 रुग्णांना दीर्घकालीन आजार होते. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 2 लाख 88 हजार 689 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 10 हजार 948 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 743 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 2 लाख 64 हजार 971 वर गेला आहे. सध्या मुंबईत 11 हजार 943 सक्रिय रुग्ण आहेत.
रुग्ण दुप्पटीचा कालावधी 302 दिवसांवर -