महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात २ हजार ९४९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान; ६० रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना लेटेस्ट न्यूज

आज राज्यात २,९४९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,८३,३६५ वर पोहचला आहे. राज्यात आज ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

corona
कोरोना

By

Published : Dec 14, 2020, 8:24 PM IST

मुंबई -आज राज्यात २,९४९ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १८,८३,३६५ वर पोहचला आहे. राज्यात आज ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४८,२६९ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५६ टक्के एवढा आहे. राज्यात सध्या एकूण ७२,३८३ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

७२,३८३ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण -

राज्यात आज ४,६१० रुग्ण बरे होऊन घरी, गेले असून आजपर्यंत एकूण १७,६१,६१५ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९३.५४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात आज ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,१७,४८,३६२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १८,८३,३६५ नमुने म्हणजेच १६.०३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ५,०४,४०६ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये तर ४,३३५ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज एकूण ७२,३८३ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा -कृषी कायद्याला विरोध : युवक काँग्रेसच्यावतीने नितीन गडकरींच्या निवासस्थानाला घेराव घालण्याचा प्रयत्न

कधी किती रुग्ण आढळून आले -

राज्यात जून दरम्यान दिवसाला ५४०० रुग्ण आढळून येत होते. लॉकडाऊनमध्ये शिथिलता दिल्यावर रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात हि रुग्णसंख्या १० हजार ५०० वर गेली होती. सप्टेंबरच्या सुरुवातीला रुग्णसंख्या २० हजार ४०० वर गेली होती. सप्टेंबर महिना संपताना रुग्णसंख्या २४ हजार ८०० वर गेली होती. मात्र ही रुग्णसंख्या गेल्या काही दिवसात कमी होत आहे. राज्यात १२ ऑक्टोबरला ७०८९ रुग्ण, १३ ऑक्टोबरला ८५२२ रुग्ण आढळून आले होते. १९ ऑक्टोबरला ५९८४ रुग्णांची, २६ ऑक्टोबरला ३६४५, ७ नोव्हेंबरला ३,९५९, १० नोव्हेंबरला ३,७९१, १५ नोव्हेंबरला २,५४४, १६ नोव्हेंबरला २,५३५, १७ नोव्हेंबरला २,८४०, २० नोव्हेंबरला ५,६४०, तर २१ नोव्हेंबरला ५७६० रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details