महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यात २ हजार ८५४ जणांना कोरोनाची लागण; ६० रुग्णांचा मृत्यू - महाराष्ट्र कोरोना लेटेस्ट न्यूज

राज्यात आज २,८५४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,१६,२३६ वर पोहचला आहे. राज्यात आज ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे.

कोरोना
कोरोना

By

Published : Dec 26, 2020, 9:11 PM IST

मुंबई -आज राज्यात २,८५४ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले आहे. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा १९,१६,२३६ वर पोहचला आहे. राज्यात आज ६० कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ४९,१८९ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून, सध्या राज्यातील मृत्यूदर २.५७ टक्के एवढा आहे. राज्यात आज एकूण ५८,०९१ अ‌ॅ‌क्टिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

हेही वाचा -'दिलेले मिशन पूर्ण झाल्याशिवाय कोल्हापूरला जाणार नाही'

रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३४ टक्के-

राज्यात आज १,५२६ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, आजपर्यंत एकूण १८,०७,८२४ कोरोनाबाधित बरे होऊन घरी गेले आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.३४ टक्के एवढे झाले आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,२४,५१,९१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १९,१६,२३६ नमुने म्हणजेच १५.४३ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ४,६४,१२१ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये असून राज्यात एकूण ५८,०९१ अ‌ॅक्टिव्ह रुग्ण आहेत.

हेही वाचा -सत्तेच्या मोहापोटी काँग्रेस नेते स्वाभिमान गहाण ठेवून अपमान कधीपर्यंत सहन करणार? - राम कदम

ABOUT THE AUTHOR

...view details