मुंबई -महानगरात मार्चपासून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव सुरू झाला असून गेले पाच महिने महापालिका कोरोनाची संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यात काही प्रमाणात पालिकेला यश आले होते. मात्र, ऑगस्ट महिन्यात आलेल्या धार्मिक सणानंतर सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून रुग्णांचा संख्येत पुन्हा वाढ होऊ लागली आहे. आज सोमवारी मुंबईत कोरोनाच्या 1837 नव्या रुग्णांची नोंद झाली असून 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
मुंबईत कोरोनाचे 1837 नवे रुग्ण, 36 रुग्णांचा मृत्यू - मुंबईत कोरोनाचे 1837 नवे रुग्ण
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर पोहचले आहे. आज (सोमवारी) कोरोनाचे 1837 नवे रुग्ण आढळून आले असून 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मुंबईमधून आज 2728 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
![मुंबईत कोरोनाचे 1837 नवे रुग्ण, 36 रुग्णांचा मृत्यू today new 1837 corona positive patient found and 36 coronary died in mumbai](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-8887021-344-8887021-1600701666081.jpg)
मुंबईत आज (सोमवारी) कोरोनाचे 1837 नवे रुग्ण आढळून आले असून 36 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 31 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 22 पुरुष तर 14 महिला रुग्ण आहेत. मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 86 हजार 150 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 8 हजार 502 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 2728 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मुंबईत डिस्चार्ज देण्यात आलेल्यांचा आकडा 1 लाख 50 हजार 535 वर गेला आहे. सध्या मुंबईत 26 हजार 735 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 81 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 57 दिवस तर सरासरी दर 1.22 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 611 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 9 हजार 865 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 10 लाख 12 हजार 423 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.