मुंबई - गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत आहे. आज राज्यात नव्या 9361 कोरोना रुग्णांची भर पडली असून 190 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तसेच आज 9101 जणांना रुग्णालयातून डिस्रार्च देण्यात आला आहे. राज्यात सद्यस्थिती 1,32,241 सक्रिय रुग्ण असून 57,19,457 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) 95.76 टक्के एवढा आहे.
एकूण रुग्ण संख्या-मुंबई महानगरपालिका ७४९, ठाणे ७७, नवी मुंबई मनपा १७८, कल्याण डोंबवली मनपा ११३, उल्हासनगर मनपा १४, भिवंडी मनपा ४६९, मीरा भाईंदर मनपा ६२, पालघर ३५३, वसई विरार मनपा १७३, रायगड ६४३, पनवेल मनपा १४९, ठाणेमंडळ एकूण २६४३, नाशिक १४४, नाशिक मनपा ६०, मालेगाव मनपा १, अहमदनगर ५४९, अहमदनगर मनपा ११, धुळे १६ धुळे मनपा, १ जळगाव ३७, जळगाव मनपा ३, नंदूरबार ६, नाशिक मंडळ एकूण ८२८, पुणे ५७९, पुणे मनपा ३१०, पिंपरी चिंचवड मनपा २४३, सोलापूर ३०८, सोलापूर मनपा १२, सातारा ७२८, पुणे मंडळ एकूण २१८०, कोल्हापूर ७२५, कोल्हापूर मनपा २९७, साांगली ५७२, साांगली मिरज कुपवाड मनपा १३९, सिंधुदुर्ग ३२९, राधानगरी ७६१, कोल्हापूर मंडळ एकूण २८२३, औरंगाबाद ९९, औरंगाबाद मनपा ३१, जालना ३८, हिंगोली ११, परभणी २४, परभणी मनपा १, औरंगाबाद मंडळ एकूण २०४, लातूर २५, लातूर मनपा १५, उस्मानाबाद ८७, बीड १५८, नांदेड २२, नांदेड मनपा १०, लातूर मंडळ एकूण ३१७, अकोला २५, अकोला मनपा १७, अमरावती ६३, अमरावती मनपा २०, यवतमाळ ६, बुलडाणा ८०, वाशिम २२, अकोला मंडळ एकूण २३३, नागपूर १६, नागपूर मनपा २८, वर्धा १०७, भांडारा ८, गोंदिया १०, चंद्रपूर २८, चंद्रपूर मनपा ६, गडचिरोली २७, नागपूर एकूण १३३.