मुंबई -राज्यात कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात आल्याने रोज तीन ते चार हजाराच्या दरम्यान नवे रुग्ण आढळून येत आहेत. त्यात काही दिवसांपासून वाढ पाहायला मिळत आहे. आज गुरुवारी ५१०८ नव्या रुग्णांची, तर १५९ मृत्यूची नोंद झाली होती. राज्यातून आज ४७३६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के इतका असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.
राज्यात ५०, ३९३ सक्रिय रुग्ण -
राज्यात ४,७३६ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६२,५२,१५० कोरोनामुक्त झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.०४ टक्के एवढे झाले आहे. राज्यात ५१०८ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १५९ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३६,७३० जणांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५ कोटी ३० लाख ४८ हजार ७० प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४ लाख ४२ हजार ७८८ (१२.१५ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २ लाख ९३ हजार १४७ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर राज्यात ५०,३९३ सक्रिय रुग्ण आहेत.