Maharashtra Corona Update : राज्यातआज 42 हजार 462 रुग्णांची नोंद, तर 23 रुग्णांचा मृत्यू - Omicron In Maharashtra
राज्यात आज 42 हजार 462 नव्या कोरोना रुग्णांची ( New corona cases in Maharashtra ) नोंद झाली आहे. तर आज 23 रुग्णांचा मृत्यू ( corona patient deaths in Maharashtra ) झाला आहे. तसेच आज 125 ओमायक्रोन संसर्ग ( Maharashtra Todays Omicron Patinet Number) असणाऱ्या रुग्णांची नोंद झाली आहे.
मुंबई - राज्यातील कोरोना रुग्णांच्या संख्येत अद्यापही वाढ होत आहे आज राज्यात 42 हजार 462 नवीन रुग्णांचे ( New corona cases in Maharashtra ) निदान झाले आहे. तर 23 कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू झाला ( corona patient deaths in Maharashtra ) आहे. सध्या राज्यातील मृत्यू दर 1.97 टक्के इतका आहे. सध्या राज्यात 22 लाख 108 रुग्ण विलगीकरणात आहेत. तर 6102 व्यक्ती संस्थात्मक विलगीकरणात आहेत. आज राज्यात 125 ओमायक्रोन संसर्ग ( Maharashtra Todays Omicron Patinet Number) असणाऱ्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर आतापर्यंत एकूण 1730 ओमायक्रोन बाधित रुग्णांची नोंद झाली आहे.