मुंबई- राज्यात बुधवारी ६ हजार १२६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी त्यात वाढ होऊन ६ हजार ६९५ नव्या रुग्णांची नोंद झाली. मात्र आज शुक्रवारी त्यात घट होऊन ५ हजार ५३९ रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी १९५ मृत्यूची नोंद झाली, त्यात घट होऊन काल गुरुवारी १२० मृत्यूंची नोंद झाली आहे. आज त्यात वाढ होऊन १८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात आज ५,८५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
५,८५९ रुग्णांना डिस्चार्ज -
राज्यात आज ५,८५९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,३०,१३७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ५,५३९ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १८७ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १,३३,७१७ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९१,७२,५३१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,४१,७५९ (१२.९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,३५,५१६ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७४,४८३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मृत्यूदर २.१ टक्के -
१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७, ४ ऑगस्टला १९५, ५ ऑगस्टला १२०, ६ ऑगस्टला १८७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.