मुंबई -राज्यात कोरोना विषाणूची बाधा झालेल्या ६,९५९ रुग्णांची शनिवारी नोंद झाली होती. रविवारी किंचित घट होऊन ६,४७९ नव्या रुग्णांची नोंद झाली. सोमवारी आणखी घट होऊन ४,८६९ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. आज (मंगळवारी) त्यात पुन्हा वाढ होऊन ६ हजार ५ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात गुरुवारी १९०, शुक्रवारी २३१, शनिवारी २२५, रविवारी १५७, सोमवारी ९० मृत्यूची नोंद झाली. आज त्यात वाढ होऊन १७७ मृत्यूची नोंद झाली आहे.
६,७९९ रुग्णांना डिस्चार्ज-
राज्यात आज (मंगळवारी) ६,७९९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. राज्यात आजपर्यंत एकूण ६१,१०,१२४ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.६६ टक्के एवढे झाले आहे. आज राज्यात ६,००५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून १७७ कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण १, ३३, २१५ मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४, ८५, ३२,५२३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,२१,०६८ (१३.०२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ४,५१,९७१ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. राज्यात ७४,३१८ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मृत्यूदर २.१ टक्के -
१९ जुलैला ६६, २० जुलैला १४७, २१ जुलैला १६५, २२ जुलैला १२०, २३ जुलैला १६७, २४ जुलैला २२४, २५ जुलैला १२३, २६ जुलैला ५३, २७ जुलैला २५४, २८ जुलैला २८६, २९ जुलैला १९०, ३० जुलैला २३१, ३१ जुलैला २२५, १ ऑगस्टला १५७, २ ऑगस्टला ९०, ३ ऑगस्टला १७७ मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यात मृत्युदर २.१ टक्के इतका नोंदवण्यात आला आहे.
रुग्णसंख्येत चढउतार -
राज्यात मागील महिन्यात १, ६ आणि १८ जुलै रोजी कोरोना विषाणूच्या सर्वाधिक ९ हजार रुग्णांची तर १९ जुलै रोजी सर्वात कमी ६०१७ रुग्णांची नोंद झाली. महिनाभरात रुग्णसंख्येत सतत चढउतार पाहायला मिळाले. गुरुवारी ७,२४२ नव्या रुग्णांची नोंद झाली होती. त्यात घट होऊन काल शुक्रवारी ६,६०० रुग्णांची नोंद झाली. शनिवारी त्यात किंचित वाढ होऊन ६,९५९ रुग्णांची नोंद झाली. रविवारी पुन्हा रुग्णसंख्येत किंचित घट होऊन ६,४७९ रुग्णांची नोंद झाली आहे. सोमवारी त्यात घट होऊन ४,८६९ रुग्ण आढळून आले आहेत. आज मंगळवारी त्यात वाढ झाली आहे.
'या' जिल्ह्यात सर्वाधिक रुग्ण -
मुंबई - २९१
रायगड - १४२
पनवेल पालिका - ८१
अहमदनगर - ७१७
पुणे - ६९०
पुणे पालिका - २४९
पिपरी चिंचवड पालिका - १५८
सोलापूर - ५४४
सातारा - ५९५
कोल्हापूर - ४६३
कोल्हापूर पालिका - १२०
सांगली - ७७७
सिंधुदुर्ग - १०२
रत्नागिरी - १८१
बीड - १२५
मागील काही दिवसातील रुग्णसंख्या -
3 ऑगस्ट - 6005 नवे रुग्ण
2 ऑगस्ट - 4869 नवे रुग्ण
1 ऑगस्ट - 6479 नवे रुग्ण
31 जुलै - 6959 नवे रुग्ण
30 जुलै - 6600 नवे रुग्ण
29 जुलै - 7242 नवे रुग्ण
28 जुलै - 6857 नवे रुग्ण
27 जुलै - 6258 नवे रुग्ण
26 जुलै - 4877 नवे रुग्ण
18 जुलै - 9000 नवे रुग्ण
7 जुलै - 9558 नवे रुग्ण
5 जुलै - 6740 नवे रुग्ण
4 जुलै - 9336 नवे रुग्ण
3 जुलै - 9489 नवे रुग्ण
1 जुलै - 9195 नवे रुग्ण