मुंबई- राज्यातील सोने आणि चांदीचे दर 'ईटीव्ही भारत' तुम्हाला दररोज दाखवणार आहे. कोणत्या शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती आहे, याची माहिती आम्ही पोहोचवणार आहे. चला तर आज कोणत्या शहरात सोन्याचा आणि चांदीचा दर किती याविषयीची माहिती घेऊया...
58 हजार रुपये तोळे एवढा सोन्याचा दर काही दिवसांपूर्वी झाला होता. मात्र आता तो दर पुन्हा एकदा कमी झाला असून 52 हजार 500 रुपये पर्यंत आला आहे. मात्र आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या घडामोडींमुळे सोन्याचा दर अजून वाढण्याची शक्यता असून येणाऱ्या काही महिन्यात तो दर 60 हजारापर्यंत देखील जाऊ शकतो, अशी शक्यता वर्तवली जात आहे.