मुंबई -मुख्य निवडणूक आयुक्त, भारत निवडणूक आयोग यांची विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी व नियोजन बघण्यासाठी मुख्य निवडणूक अधिकाऱ्याच्या उपस्थितीत विविध उपक्रमांबाबत बैठक सुरू आहे. आज सायकाळी ५ वाजता विविध कार्यक्रमांचे उद्घाटन सह्याद्री अतिथीगृह, मलबार हिल, मुंबई येथे होणार आहे.
राज्याचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक, गृह विभागाचे प्रधान सचिव आणि राज्य शासनाच्या इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत आज आगामी निवडणुकी संदर्भात निवडणूक आयोगाची बैठक सुरू आहे. या बैठकीमध्ये वरिष्ठ उप निवडणूक आयुक्त उमेश सिन्हा आणि संदीप सक्सेना, उप निवडणूक आयुक्त सुदीप जैन आणि चंद्र भूषण कुमार, महासंचालक धीरेंद्र ओझा, संचालक ( वित्त ) विक्रम बात्रा, पीआयबीच्या अतिरिक्त महासंचालक शेफाली शरण, सचिव ए . एन . दास आणि अवर सचिव आय . सी . गोयल आदी वरिष्ठ अधिकाऱ्यांचाही सहभाग आहे.
या उपक्रमांचे होणार उद्धाटन -
मतदार जागृती वाहनांला झेंडी दाखवून उद्घाटन