मुंबई -राज्यात कोरोना लसीकरणाचा तिसरा टप्पा सुरू आहे. मंगळवारी (2 मार्च 2021) दुसऱ्या दिवशी 60 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 12 हजार 299 लाभार्थ्यांना कोरोना लसीचा पहिला डोस देण्यात आला. तर 45 ते 60 वयोगटातील गंभीर आजार असणाऱ्या 3 हजार 812 लाभार्थ्यांना लसीकरणाचा पहिला डोस देण्यात आला आहे.
राज्यात आज एकूण 33 हजार 44 लाभार्थ्यांना कोरोना लस देण्यात आली. त्यांपैकी 26 हजार 522 लाभार्थ्यांना पहिला डोस तर 6 हजार 522 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी 5 हजार 822 आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिला लशीचा डोस देण्यात आला. तर 4 हजार 589 फ्रन्टलाइन वर्कर यांना पहिला डोस देण्यात आला. त्याच बरोबर 6570 आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीचा दुसरा डोस देण्यात आला आहे. आतापर्यंत राज्यात 12 लाख 66 हजार 108 लाभार्थ्यांना कोविडची लस देण्यात आली आहे.