मुंबई -राज्यात कोरोनाची लाट झपाट्याने वाढत आहे. सोमवारी तब्बल 60 हजार 212 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. तर आज 31 हजार 624 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दिवसभरात कोरोनामुळे 281 जणांचा मृत्यू झाला आहे. सातत्याने वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या राज्यासाठी चिंतेचा विषय बनली आहे.
राज्यात आज 60 हजार 212 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे, त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 35 लाख 19 हजार 208 वर पोहोचला आहे. आज 31 हजार 624 रुग्णांनी कोरोनावर मात केल्याने कोरोनामुक्तांचा एकूण आकडा 28 लाख 66 हजार 097 वर पोहोचला आहे. राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 281 रुग्णांचा मृत्यू झाला असून, मृत्यूदर 1.66 टक्के एवढा आहे. सध्या राज्यात 5 लाख 93 हजार 42 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
राज्यातील या भागात झाली सर्वाधिक कोरोनाबाधितांची नोंद
मुंबई महानगरपालिका- 7,873
ठाणे- 1,193
ठाणे मनपा- 1,657
नवी मुंबई-1,149
कल्याण डोंबिवली- 1308
उल्हासनगर-160
मीराभाईंदर-596
पालघर-423
वसई विरार मनपा-570
रायगड-929
पनवेल मनपा-644
नाशिक-1,672
नाशिक मनपा-2,659
अहमदनगर-2,025
अहमदनगर मनपा-527
धुळे- 212
जळगाव-860
जळगाव मनपा-108
नंदुरबार-525
पुणे- 2,938
पुणे मनपा- 5,214
पिंपरी चिंचवड- 1,867
सोलापूर- 934
सोलापूर मनपा-341
सातारा - 1,078
कोल्हापुर-224
सांगली- 442
औरंगाबाद मनपा 656
सिंधुदुर्ग-319
रत्नागिरी-161
औरंगाबाद-571
जालना-658
हिंगोली-390
परभणी -331
परभणी मनपा-219
लातूर 1,297
उस्मानाबाद-657
बीड -1,052
नांदेड मनपा-995
नांदेड-621
अकोला मनपा-225
अमरावती मनपा-132
अमरावती 246
यवतमाळ-254
बुलढाणा-103
वाशिम - 412
नागपूर- 2,122
नागपूर मनपा-5,084
वर्धा-831
भंडारा-1,138
गोंदिया-730
चंद्रपुर-638
चंद्रपूर मनपा-212
हेही वाचा -ज्येष्ठ अभिनेते विरा साथीदार यांचे कोरोनामुळे निधन