महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोनाचे 4966 नवे रुग्ण, 78 रुग्णांचा मृत्यू

आज 4966 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूची संख्या वाढताना दिसत आहे.

संग्रहित फोटो
संग्रहित फोटो

By

Published : Apr 28, 2021, 8:51 PM IST

मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूचे 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते. दोन दिवस 5 हजाराच्या घरात रुग्ण आढळून आले. सोमवारी त्यात आणखी घट होऊन 3876 नवे रुग्ण आढळून आले होते. काल मंगळवारी 4014 नवे रुग्ण आढळून आले होते. आज त्यात किंचित वाढ झाली आहे. आज 4966 नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर 78 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून मृत्यूची संख्या वाढताना दिसत आहे.

5 हजार 300 रुग्णांना डिस्चार्ज -
मुंबईत आज 4 हजार 966 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 40 हजार 507वर पोहचला आहे. आज 78 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मृतांचा आकडा 12 हजार 990 वर पोहचला आहे. 5 हजार 300 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 5 लाख 60 हजार 401 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 65 हजार 589 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 87 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 74 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 120 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 1 हजार 114 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 39 हजार 135 तर आतापर्यंत एकूण 53 लाख 41 हजार 625 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.

हे विभाग हॉटस्पॉट -
मुंबईत अंधेरी, कांदिवली, गोरेगाव, वांद्रे, मालाड, जोगेश्वरी, मुलुंड, चेंबूर, घाटकोपर आदी विभाग कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले आहे. या विभागात सर्वाधिक कोरोना सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे या विभागात कोरोना नियमांची कडक अंमलबजावणी महापालिकेने सुरू केली आहे.

अशी वाढली रुग्णसंख्या -
गेल्या वर्षभरात 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938, 9 एप्रिलला 9200, 10 एप्रिलला 9327, 11 एप्रिलला 9989, 12 एप्रिलला 6905, 13 एप्रिलला 7898, 14 एप्रिलला 9925, 15 एप्रिलला 8217, 16 एप्रिलला 8839, 17 एप्रिलला 8834, 18 एप्रिलला 8479, 19 एप्रिलला 7381, 20 एप्रिलला 7214, 21 एप्रिलला 7684, 22 एप्रिलला 7410, 23 एप्रिलला 7221, 24 एप्रिलला 5888, 25 एप्रिलला 5542, 26 एप्रिलला 3876, 27 एप्रिलला 4014, 28 एप्रिलला 4966 नवे रुग्ण आढळून आले आहेत.

या दिवशी कमी रुग्णांची नोंद-
मुंबईत मार्च पासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. मुंबईत 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.

ABOUT THE AUTHOR

...view details