मुंबई - मध्य रेल्वेद्वारा सर्वात पहिली 12 डब्यांची लोकल 8 सप्टेंबर 1986 रोजी सुरू झाली होती. आज त्याला बरोबर 36 वर्षे झाली. मध्य रेल्वेने त्या संदर्भात ट्विट करून त्याबद्दलचा आनंद व्यक्त केला आहे. जनतेच्या मागणीनंतर आधी दहा डब्यांच्या लोकल ट्रेननंतर १२ डब्यांची करण्यात आली. आज त्याला बरोबर 36 वर्ष होत आहेत. लोकल ट्रेन नसत्या तर मुंबईचे काय झाले असते याची कल्पनाही करवत नाही.
मुंबईत आजच्या दिवशी सुरू झाली होती पहिली 12 डब्यांची लोकल ट्रेन मुंबई मुंबईची रक्तवाहिनी ज्याला म्हटलं जातं. ते म्हणजे अहोरात्र चालणाऱ्या लोकल ट्रेन. आजही 60 ते 70 लाख लोक ट्रेनने रोज प्रवास करतात. मुंबईचं जीवन या लोकल ट्रेनमुळेच अखंड सुरू आहे. जर लोकल ट्रेन या रीतीने चालल्या नसत्या तर कदाचित मुंबईच्या विकासाची आपण कल्पनाही करू शकत नाही, असे प्रवासी आणि कामगार संघटनेचे नेते विजय कुलकर्णी यांनी सांगितले.
यासंदर्भात मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी केके सिंग यांच्याशी ईटीवी भारतने बातचीत केली असता ते म्हणाले की, पूर्वी लोकसंख्या कमी होती. आजच्या एवढी गर्दी आणि वर्दळ नव्हती. तरीही मुंबईची खासियत होती की, मुंबईमध्ये प्रचंड गर्दी होते. मात्र 1980 आणि 90 च्या दशकामध्ये लोकसंख्या प्रचंड वाढायला लागली. शिक्षणाचे प्रमाण वाढायला लागले. औद्योगीकरण वाढायला लागले. त्यामुळे छोट्या गावातून छोट्या शहरातून मुंबईकडे येणाऱ्यांचा ओघ सुरू राहिला. वाढत्या प्रवासी जनतेच्या मागणीमुळे मध्य रेल्वेने ८ सप्टेंबर दोन 1986 रोजी पहिली 12 डब्याची लोकल ट्रेन सुरू केली. ज्यामुळे एकाच ट्रेनमध्ये अधिक प्रवासी वाहून नेण्याची क्षमता वाढली.
मुंबईची लोकसंख्या देशातील सगळ्यात मोठे लोकसंख्या घनतेचे शहर असल्याने सर्वाधिक आहे. येथील लोकांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग म्हणून लोकलकडे पाहिले जाते. त्यामुळे वेगवेगळे सण समारंभही या लोकलमध्ये साजरे केले जातात. लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय असणारी ही लोकल 12 डब्यांची झाल्यामुळे अधिक लोकांना त्यामध्ये सामावून घेतले जाऊ लागले. त्याची समस्त मुंबईकरांना आठवण आजही आहे.