मुंबई -राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांमध्ये वाढ होत आहे. आज राज्यात तब्बल 35 हजार 726 कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 166 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दररोज वाढणारी ही आकडेवारी चिंतेत भर घालणारी आहे. 2020 च्या अखेरीस कोरोना रुग्णांमध्ये घट झाली होती. मात्र फेब्रुवारीपासून पुन्हा एकदा कोरोनाने डोके वर काढले आहे.
राज्यातील कोरोना स्थिती
राज्यात आज दिवसभरात 35 हजार 726 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. त्यामुळे कोरोनाबाधितांचा एकूण आकडा हा 26 लाख 73 हजार 461 वर पोहोचला आहे. तर आज दिवसभरात 14 हजार 523 जणांनी कोरोनावर मात केली आहे. कोरोमुक्तांची एकूण संख्या ही 23 लाख 14 हजार 579 वर पोहोचली आहे. गेल्या 24 तासांमध्ये 166 जणांचा मृत्यू झाला असून, राज्यातील मृत्यू दराचे प्रमाण 2.2 टक्के एवढे आहे. सध्या राज्यात एकूण 3 लाख 3 हजार 475 रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
या भागात आढळले सर्वाधिक रुग्ण
मुंबई महानगरपालिका- 6,130
ठाणे- 481
ठाणे मनपा- 939
नवी मुंबई-827
कल्याण डोंबिवली- 859
उल्हासनगर मनपा- 123
मीराभाईंदर- 179
पालघर- 147
वसई विरार मनपा-263
रायगड-180
पनवेल मनपा-448
नाशिक-1068
नाशिक मनपा-2422
अहमदनगर- 414
अहमदनगर मनपा-225
धुळे- 414
धुळे मनपा - 160
जळगाव- 755
जळगाव मनपा- 317
नंदुरबार-399
पुणे- 1382
पुणे मनपा- 3,522
पिंपरी चिंचवड- 1,687
सोलापूर- 306
सोलापूर मनपा- 226
सातारा - 359
सांगली- 110
औरंगाबाद मनपा-1040
औरंगाबाद-461
जालना-524
हिंगोली- 123
परभणी -106
लातूर मनपा-237
लातूर 237
उस्मानाबाद-190
बीड -382
नांदेड मनपा-702
नांदेड-404
अकोला- 115
अकोला मनपा-207
अमरावती-183
अमरावती मनपा- 208
यवतमाळ-404
बुलडाणा-454
वाशिम - 519
नागपूर- 1066
नागपूर मनपा-2675
वर्धा-245
भंडारा-201