मुंबई -गेल्या तीन महिन्यापासून संपावर ( ST Worker Strike ) ठाम असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांना वारंवार कामावर येण्याचे आवाहन करुन देखील कर्मचारी कामावर येत नसल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांची गैरसोय होत आहे. त्यामुळे एसटी महामंडळाने ( MSRTC Take Action Against Worker ) कारवाईच सत्र सुरु केले आहे. आज महामंडळाने ( MSRTC Suspend ST Worker ) २७० निलंबित कर्मचाऱ्यांना बडतर्फ केले असून आता बडतर्फ कर्मचाऱ्यांची संख्या ६ हजार ४२६ वर पोहचली आहे. तर आतापर्यत ७ हजार ८७६ कर्मचाऱ्यांना बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावल्या आहे.
११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई -
एसटी महामंडळ विलीनीकरणाच्या मागणीवरुन सुरु असलेला संपामुळे सर्वसामान्य नागरिकांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. महामंडळाने कामगारांना अंतरिम वेतनवाढ, निलंबन आणि बडतर्फीची कारवाई करू सुद्धा कर्मचारी आंदोलन मागे घेत नाही आहे. या संपावर तोडगा निघावा, यासाठी एसटी कृती समितीच्या सदस्यांनी पुन्हा एकदा एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर रूजू व्हावे, असं आवाहन केले. मात्र, तरी सुद्धा कर्मचारी संपावर ठाम असल्याने आता महामंडळाची कारवाई जोरदार सुरु आहे. आज २७० कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. एकूण बडतर्फ कर्मचारी संख्या ६ हजार ४२६ झाली आहे. आतापर्यत ११ हजार २४ कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली आहे. तसेच एकूण बडतर्फीची कारणे दाखवा नोटीस बजावलेल्या कर्मचाऱ्यांची संख्या ७ हजार ८७६ झाली आहे.
६२ हजार पेक्षा जास्त कर्मचारी संपात -