मुंबई - मुंबईत गेल्या काही दिवसांपूर्वी कोरोनाबाधितांची संख्या वाढली होती, दिवसाला 7 ते 11 हजारांच्या दरम्यान रुग्ण आढळून येत होते, मात्र आता रुग्ण संख्येत घट होताना दिसत आहे. आज मुंबईमध्ये कोरोनाचे 1442 नवे रुग्ण आढून आले असून, 62 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये 2333 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईत आज 1 हजार 442 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा एकूण आकडा 6 लाख 87 हजार 152 वर पोहोचला आहे. आज 62 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा एकूण आकडा 14 हजार 200 वर पोहोचला आहे. तर 2 हजार 333 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने, कोरोनामुक्तांची एकूण संख्या 6 लाख 34 हजार 315 वर पोहोचली आहे. मुंबईत सध्या 36 हजार 674 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92 टक्के असून, रुग्ण दुपटीचा कालावधी 213 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 87 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 377 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 24 हजार 896 तर आतापर्यंत एकूण 58 लाख 76 हजार 175 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
अशी वाढली रुग्णसंख्या -
1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले होते. त्यात वाढ होत जाऊन 18 मार्चला 2877, 19 मार्च 3062, 20 मार्चला 2982, 21 मार्चला 3775, 22 मार्चला 3260, 23 मार्चला 3512, 24 मार्चला 5185, 25 मार्चला 5504, 26 मार्चला 5513, 27 मार्चला 6123, 28 मार्चला 6923, 29 मार्चला 5888, 30 मार्चला 4758, 31 मार्चला 5394, 1 एप्रिल 8646, 2 एप्रिलला 8832, 3 एप्रिलला 9090, 4 एप्रिलला 11,163, 5 एप्रिलला 9857, 6 एप्रिलला 10030, 7 एप्रिलला 10428, 8 एप्रिलला 8938, 9 एप्रिलला 9200, 10 एप्रिलला 9327, 11 एप्रिलला 9989, 12 एप्रिलला 6905, 13 एप्रिलला 7898, 14 एप्रिलला 9925, 15 एप्रिलला 8217, 16 एप्रिलला 8839, 17 एप्रिलला 8834, 18 एप्रिलला 8479, 19 एप्रिलला 7381, 20 एप्रिलला 7214, 21 एप्रिलला 7684, 22 एप्रिलला 7410, 23 एप्रिलला 7221, 24 एप्रिलला 5888, 25 एप्रिलला 5542, 26 एप्रिलला 3876, 27 एप्रिलला 4014, 28 एप्रिलला 4966, 29 एप्रिलला 4192, 30 एप्रिलला 3925, 1 मे ला 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447 नवे रुग्ण आढळून आले आहेत.
या दिवशी झाली कमी रुग्णांची नोंद
मुंबईत मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. 7 नोव्हेंबरला 576, 10 नोव्हेंबरला 535, 16 नोव्हेंबरला 409, 18 जानेवारीला 395, 24 जानेवारीला 348, 26 जानेवारीला 342, 1 फेब्रुवारीला 328 म्हणजेच सर्वात कमी रुग्ण आढळून आले आहेत.
हेही वाचा -कोरोनाच्या वैश्विक संकटातून भारत जिंकणार - मोहन भागवत