महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राज्यातील शाळांमध्ये होणार व्यसनमुक्तीसाठी 'तंबाखूची होळी'

जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून राज्यातील शाळांमध्ये व्यसनमुक्तीबाबत कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासोबत कर्करोग आणि त्यासाठी जनजागृती करण्यासाठी तंबाखूची प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे.

By

Published : Feb 4, 2020, 4:55 AM IST

Holi of tobacco on World Cancer Day
जागतिक कर्करोग दिनानिमित्त शाळांमध्ये होणार तंबाखूची होळी

मुंबई - जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून राज्यातील शाळांमध्ये व्यसनमुक्तीबाबत कार्यक्रम राबवण्यात येणार आहे. त्यासोबत कर्करोग आणि त्यासाठी जनजागृती करण्यासाठी तंबाखूची प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे. यासाठीचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे.

जागतिक कर्करोग दिनानिमित्त राज्यातील शाळांमध्ये होणार तंबाखूची होळी...

हेही वाचा... गेल्या 5 वर्षात शासन जनतेला भेटले आहे, असे मला वाटत नाही : गृहराज्यमंत्री सतेज पाटील

सर्व शाळांमधे तंबाखूची प्रतिकात्मक होळी करण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन करण्याचा सूचना विभागाने दिल्या आहेत. या प्रतिकात्मक होळीसाठी सलाम बॉम्बे नावाच्या या सामाजिक संस्थेची अनेक शाळांमध्ये मदत घेतली जाणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या या निर्णयाचे मुख्याध्यापक आणि शिक्षक संघटनांनी स्वागत केले आहे. शालेय विद्यार्थ्यांचे व्यासनमुक्तीचे धडे दिल्याने त्याचा लाभ पुढील पिढीला होणार असल्याचे मत महाराष्ट्र शिक्षण क्रांती संघटनेचे सचिव सुधीर घागस यांनी व्यक्त केले.

हेही वाचा... काँग्रेस नेत्याने स्वतःच्या मुलावरच झाडली गोळी, संपत्तीच्या वादातून घडला प्रकार

विद्यार्थ्यांमध्ये विविध आजारांबाबत विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती व्हावी, यासाठी शालेय शिक्षण विभागाच्यावतीने विविध उपक्रम राबवण्यात येतात. त्याचा फायदा पालक आणि विद्यार्थी दोघांना होतो. त्यामुळे शालेय शिक्षण विभाग विविध जागतिक दिनाच्या दिवशी विविध कार्यक्रमे आयोजित करण्याचे आवाहन करते. आज कर्करोगामुळे देशात हजारो नागरीकांना आपले जीव गमवावे लागत आहे. तंबाखू आरोग्यासाठी धोकादायक आहे. यामुळे विद्यार्थ्यांना तंबाखू आणि कर्करोग यासंदर्भात माहिती मिळावी, म्हणून शाळेत जागतिक कर्करोग दिनाचे औचित्य साधून तंबाखूची प्रतिकात्मक होळी केली जाणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details