मुंबई :राज्यातील शेतकरी अडचणीत असताना मुख्यमंत्री सत्कार सोहळ्यात दंग आहेत, अशी टीका अजित पवार यांनी केली. उघड्यावर शेतकऱ्यांचा संसार (To save the lives of farmers in the state)आलेला असून मुख्यमंत्र्यांनी (CM) तात्काळ तिकडे लक्ष द्यावे. अशी मागणी करणारे पत्र (Ajit Pawar will give a letter) देणार असल्याचे, पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकताच पूरग्रस्त विदर्भ आणि मराठवाड्याचा दौरा केला होता. त्यानंतर ते मुंबईत बोलत होते.
मराठवाड्याला पुराचा मोठा फटका बसला आहे. परंतु अजूनही सरकारी मदत मिळालेली नाही. बीडमध्ये गोगलगायमुळे पीक गेले आहे. यामध्ये काही हजार हेक्टर क्षेत्र बाधित झाले आहे. सुरुवातीला काही भागात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी दौरा केला. मात्र, त्यानंतर लक्ष दिले नाही. खरंतर केंद्राच्या पाहणी पथकाला बोलवायला हवे होते. मात्र अजूनही तसे केले नसल्याचे पवार म्हणाले. तसेच राज्याच्या इतर भागात अतीवृष्टी झालेली आहे. तिथे देखील मदत द्यायला हवी. सध्या पीक विम्याचा प्रश्न आहे. अजूनही त्याबाबत निर्णय झालेला नाही. शैक्षणिक शुल्क माफ करण्याची आवश्यकता आहे. मात्र,अजूनही त्यावर देखील निर्णय घेतला गेला नसल्याचे; अजित पवार यांनी सांगितले.
संवेदनशुन्य मुख्यमंत्री :राज्यात अतिवृष्टी असतांना मुख्यमंत्री नाशिक, औरंगाबाद मध्ये फक्त मिरवणूक काढत आहे. रात्री उशिरापर्यंत सोहळे करत आहेत. खरंतर 10 वाजल्यानंतर माईक बंद करायचा असतो. मात्र न्यायालयाचे नियम मुख्यमंत्री तोडतात, त्यांना करणार काय? बोलणार काय? असा सवाल पवार यांनी उपस्थित केला. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी यावर लक्ष घालायला हवे. अतीउत्साही कार्यकर्त्यांना आवर घालावे, अशी सूचना केली.