मुंबई - महाराष्ट्रातून राज्यसभेसाठी भाजपने तिसऱ्या जागेचा उमेदवार जाहीर केला. अनेकांना पाटीमागे टाकत डॉ. भागवत कराड यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. आपला उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डॉ. भागवत आज (शुक्रवार) विधीमंडळात दाखल झाले.
भाजपच्या वतीने महाराष्ट्रातून पक्षाच्या तिसऱ्या जागेसाठी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, हंसराज अहिर, विजया रहाटकर यांच्यासह अनेक नावे चर्चेत होती. परंतु पक्षाकडून डॉ. भागवत कराड यांना संधी देण्यात आली. तसेच अमरीश पटेल यांना विधानपरिषदेच्या पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी देण्यात आली आहे.
राज्यसभा निवडणूक : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी डॉ. भागवत विधिमंडळात दाखल हेही वाचा...पाच वर्षांत ७७ लाख ३३ हजार ९८४ रूपयांनी वाढले उदयनराजेंचे उत्पन्न
राज्यसभेसाठी भाजपच्या केंद्रीय संसदीय समितीकडून राज्यसभेची पहिली यादी बुधवारी (11 मार्च) जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून रामदास आठवले आणि उदयनराजे भोसले यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. त्या दोघांनीही गुरुवारी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. तर आज शुक्रवारी डॉ. भागवत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. काँग्रेसकडून तिसऱ्या जागेसाठी राजीव सातव यांची उमेदवारी जाहीर झाली असून, ते देखील आजच उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. जर भाजपकडून चौथ्या जागेसाठी उमेदवार न दिल्यास आणि महाविकास आघाडीकडून एकमतने एक उमेदवार दिल्या राज्यसभेची निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.