महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत तिरंगा गौरव यात्रेतून देण्यात आला सामाजिक एकतेचा संदेश - तिरंगा गौरव यात्रेतून सामाजिक एकतेचा संदेश

या यात्रेत विविध सामाजिक संदेश देण्यात आले. तसेच विविध वेशभूषा करून पारंपरिक पोषाखात अनेक नागरिक सहभागी झाले होते.

मुंबईत तिरंगा गौरव यात्रेतून देण्यात आला सामाजिक एकतेचा संदेश

By

Published : Aug 15, 2019, 3:20 PM IST


मुंबई - आज भारताच्या 73 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त अंधेरी पूर्व परिसरात परमपूज्य आचार्य देव जे. पी. मारा साहेब यांच्या नेतृत्वाखाली तिरंगा गौरव यात्रा काढण्यात आली. यातून सामाजिक एकता, बंधुता, प्रेम व अहिंसेचा संदेश यात्रेतून देण्यात आला.

मुंबईत तिरंगा गौरव यात्रेतून देण्यात आला सामाजिक एकतेचा संदेश
या यात्रेत विविध सामाजिक संदेश देण्यात आले. तसेच विविध वेशभूषा करून पारंपरिक पोषाखात अनेक नागरिक सहभागी झाले होते. या यात्रेत महात्मा गांधी तर कोणी देशाचे पहिले माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि शिवाजी महाराजांच्या वेषात अवतरले होते. अंधेरी पोलीस ठाणे परिसरात पोलिसांना सलामी देऊन यात्रा अंधेरी पूर्व परिसरात मार्गस्थ झाली. यावेळी यात्रेत मोठ्या प्रमाणात दुचाकीस्वारदेखील सहभागी झाले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details