महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

#corona: न्यूयॉर्कमध्ये वाघिणीला कोरोना, मुंबईच्या राणीबागेतील प्राण्यांची घेतली जातेय विशेष काळजी

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने हजारो लोकांचा बळी घेतला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूची लागण मनुष्य प्राण्याला होत होती मात्र न्यूयॉर्क शहरातील ब्रॉनेक्स प्राणी संग्रहालयातील चार वषीर्य वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याने या विषाणूने आता प्राण्यांमध्येसुद्धा प्रवेश केल्याचे समोर आले आहे.

ranibagh
न्यूयॉर्कमध्ये वाघिणीला कोरोना, मुंबईच्या राणीबागेतील प्राण्यांची घेतली जातेय विशेष काळजी

By

Published : Apr 7, 2020, 8:42 AM IST

मुंबई - कोरोना विषाणूने मनुष्य प्राण्यानंतर आता मुक्या प्राण्यांना लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. अमेरिकेत न्यूयॉर्क येथे एका वाघिणीला कोरोना विषाणूची लागण झाल्याचे समोर आले आहे. या विषाणूचा प्रसार मुंबईतही झाला असल्याने भयखळाच्या राणीबागेत असलेल्या 300 हुन अधिक प्राणी आणि पक्षांची विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती प्राणी संग्रहालयाचे प्रमुख डाॅ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. या विषाणूने हजारो लोकांचा बळी घेतला आहे. भारतातही कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूची लागण मनुष्य प्राण्याला होत होती मात्र न्यूयॉर्क शहरातील ब्रॉनेक्स प्राणी संग्रहालयातील चार वषीर्य वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याने या विषाणूने आता प्राण्यांमध्येसुद्धा प्रवेश केल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे प्राणी संग्रहालयातील कोरोनाग्रस्त सुरक्षा रक्षकामुळे या वाघिणीला कोरोनाची लागण झाल्याचे समजते. प्राण्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे समजताच भायखळा राणीबाग प्रशासन सावध झाले असून राणीबागेतील प्राणी पक्ष्यांची योग्य काळजी घेतली जात आहे.

न्यूयॉर्कमध्ये वाघिणीला कोरोना, मुंबईच्या राणीबागेतील प्राण्यांची घेतली जातेय विशेष काळजी
मुंबईसह भारतात कोरोना विषाणूचे पाॅझिटीव्ह रुग्ण आढळले त्यानंतर २३ मार्चला लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली, त्या दिवसापासून राणी बाग पूर्णतः बंद करण्यात आली आहे. प्राणी संग्रहालयात काम करणारे कर्मचारी राणीबागेतच आहेत. ते बाहेर जात नाहीत. प्रत्येक कामगार, सुरक्षा रक्षकांना वेळोवेळी सॅनिटायजर व पाण्याने हात साफ करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्राणी आणि पक्षांचे पिंजरे वेळोवेळी स्वच्छ केले जात आहेत. राणी बाग परिसरातील आतील भागात जंतूनाशक फवारणी करण्यात आल्याचेही त्रिपाठी यांनी सांगितले. लाॅकडाऊनमुळे देवनार कत्तलखाना बंद आहे. त्यामुळे प्राणी पक्षी यांची जेवणाची गैरसोय होऊ नये म्हणून विशेष काळजी घेतली जात आहे. कंत्राटदारांच्या माध्यमातून रोज चिकन, मटण, अंडी अशा प्रकारचे प्राण्यांचे जेवण कंत्राटदाराकडून मागवण्यात येत आहे. पेंग्विन असलेला कक्ष आधीच सुरक्षित ठेवण्यात आला आहे. पेंग्विन ठेवलेल्या ठिकाणी कोणालाही जाण्यास मनाई करण्यात आली आहे. सध्या ७ पेंग्विन असून त्यांचीही विशेष काळजी घेतली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. २३ मार्चपासून प्राणी संग्रहालय बंद असल्याने राणीबागेचा लाखोंचा महसूल वाया गेला आहे. याबाबत बोलताना महसुलापेक्षा प्राण्यांच्या आरोग्याची काळजी घेण्याला प्राधान्य दिले जात असल्याचे त्रिपाठी यांनी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details