महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

गणेशोत्सव; अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलिसांचा चोख बंदोबस्त - update ganeshotsav news

मुंबई शहरात वाहतूक विभाग, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक , आर ए एफ , बीबीडीएस, होमगार्ड यांच्यासह स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जाणार आहे. याबरोबरच, मुंबई शहरात असलेल्या 5000 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत सुद्धा घेतली जाणार आहे.

ganeshotsav
संग्रहित छायाचित्र

By

Published : Aug 31, 2020, 8:19 PM IST

मुंबई - भारतात उद्भवलेल्या कोरोना संक्रमणाच्या संकटामुळे संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गणपती विसर्जनावर यंदा मर्यादा आलेल्या आहेत. ही वस्तुस्थिती व सावधगिरीच्या उपाय योजना विचारात घेऊन मुंबई पोलिसांनी या वेळेस गणपती विसर्जनासाठी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवला आहे. 1 सप्टेंबरला अनंतचतुर्दशी सण साजरा होणार असून यासाठी मुंबई पोलिसांनी मुंबई शहरात तब्बल 35 हजार पेक्षा जास्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांचा चोख बंदोबस्त ठेवला आहे.

याबरोबरच मुंबई शहरात वाहतूक विभाग, सशस्त्र दल, राज्य राखीव पोलीस बल, दंगल नियंत्रण पथक, जलद प्रतिसाद पथक , आर ए एफ , बीबीडीएस, होमगार्ड यांच्यासह स्वयंसेवी संस्था यांची मदत घेतली जाणार आहे. याबरोबरच, मुंबई शहरात असलेल्या 5000 सीसीटीव्ही कॅमेऱ्याची मदत सुद्धा घेतली जाणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी स्थानिक पोलिसांच्या मदतीने जलतरणपटू तसेच तटरक्षक दलाच्या मदतीने बोटी लॉंचेस उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत.


नागरिकांनी गणपती विसर्जनाला येण्याअगोदर आरती व पूजा ही विसर्जनस्थळी न करता घरीच करावी, गणेश विसर्जन करिता महापालिकेने 167 कृत्रिम विसर्जन स्थळ निर्माण केली आहेत. त्याचा वापर करावा, याबरोबरच रस्त्यावर गर्दी न करता नैसर्गिक विसर्जन स्थळांवर विनाकारण न जाण्याचा आग्रह मुंबई पोलिसांनी केला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details