मुंबई- सध्या समाज माध्यमं खूप महत्वाची झाली आहेत. खासकरून सेलिब्रिटींसाठी. कारण ते एकाच वेळी लाखो चाहत्यांशी जोडले जातात. अभिनेता टायगर श्रॉफने काही दिवसांपूर्वी आपल्या आवाजातील 'कॅसिनोवा' हे गाणं त्याच्या यूट्यूबवर रिलीज केले आहे. या गाण्याला चाहत्यांनी भरभरुन पसंती दिली आहे.
टायगरच्या आवाजातील ‘कॅसिनोवा’ गाणे रिलीज: चाहत्यांची भरभरुन पसंती - टायगर श्रॉफ न्यूज
गायिका रवीना मेहताने अविस्तेश श्रीवास्तव सोबत यादे या गीतातून संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर लोकडाऊन मध्ये रवीना ने ऋषी रिच, राहुल जैन, रिषभ कांत यांच्यासोबत तब्बल ४ गाणी रिलीज केली आहेत.
टायगरसोबत गायिका रवीना मेहताचा आवाज
नुकताच टायगर ह्या गाण्याची ध्वनिक आवृत्ती म्हणजेच ऍकॉस्टिक व्हर्जनचे (acoustic version) टीजर त्याच्या इन्स्टाग्राम वर पोस्ट केले आहे. ह्या गाण्यात टायगर सोबत गायिका रवीना मेहताने सुद्धा आपला मधुर आवाज दिला आहे. गायिका रवीना मेहताने अविस्तेश श्रीवास्तव सोबत यादे या गीतातून संगीत क्षेत्रात पदार्पण केले होते. त्यानंतर लोकडाऊन मध्ये रवीना ने ऋषी रिच, राहुल जैन, रिषभकांत यांच्यासोबत तब्बल ४ गाणी रिलीज केली.
अभिनेत्याबरोबर टायगर एक चांगल गायक
गायिका रवीना मेहताला टायगर आणि तिच्या टीमसोबत काम केल्याबद्दलच्या अनुभवाविषयी विचारले असता ती म्हणाली की "मी जेव्हा टायगर चा हीरोपंती पाहिला होता तेव्हा पासूनच मी त्याची खूप मोठी चाहती आहे. टायगर हा एक उत्तम कलाकार आणि डान्सर तर आहेच आणि त्यासोबत एक चांगला गायकसुद्धा आहे. आणि अशा कलाकाराबरोबर मला काम करायची संधी मिळाली यासाठी मी खूप आनंदी आहे. हे संपूर्ण गाणं लॉकडाऊनमध्येच झाले आणि ह्या सगळ्य साठी मी अवितेश श्रीवास्तव आणि टायगर च्या संपूर्ण टीमचे आभार मानते. चाहत्यांकडून मिळण्याऱ्या प्रतिसादाची मी आतुरतेने वाट बघते असल्याचेही रवीना म्हणाली.