महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

TIFR Notice Withdrawn : कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर सरकारविरोधात पोस्ट करू नये; याबाबतची नोटीस TIFR ने घेतली मागे - टीआयएपआर कर्मचारी सोशल मीडिया निर्बंध

कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सरकारविरोधात विधान न करण्याबाबत एक नोटीस काढली होती. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ही नोटीस जारी (TIFR Notice Anti Government Statements ban) केली होती. अखेर सोमवारी ही नोटीस टीआयएफआरने मागे घेतली (TIFR Notice to employees Withdrawn) आहे.

social media file photo
सोशल मीडिया फाईल फोटो

By

Published : Apr 19, 2022, 4:58 PM IST

मुंबई - कर्मचाऱ्यांना सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सरकारविरोधात विधान न करण्याबाबत एक नोटीस काढली होती. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च (TIFR) ने ही नोटीस जारी (TIFR Notice Anti Government Statements ban) केली होती. अखेर सोमवारी ही नोटीस टीआयएफआरने मागे घेतली (TIFR Notice to employees Withdrawn) आहे. याबाबतची माहिती संस्थेचे प्रवक्ते अजय अभ्यंकर यांनी दिली आहे.

ती नोटीस संस्थेने मागे घेतली - टीआयएफआर ही अणुऊर्जा विभागाच्या अंतर्गत देशातील प्रमुख वैज्ञानिक संस्थांमधील एक प्रमुख संस्था आहे. शनिवारी या संस्थेने एक नोटीस जारी केली होती. या संस्थेच्या कर्मचाऱ्यांनी सोशल मीडियावर लिहिताना सरकारविरोधात लिहू नये असे नमूद केले होते. यानंतर अनेक आरोप-प्रत्यारोप झाले. मात्र, सोमवारी ही नोटीस संस्थेने मागे घेतली आहे.

कर्मचाऱ्यांवर लादले होते निर्बंध - TIFR च्या निबंधकांनी सर्व TIFR कर्मचार्‍यांना नोटीस जारी केली होती, यामध्ये दोन प्रमुख मुद्द्यांना बंदी घालण्यात आली होती. यामध्ये पहिली बंदी होती ती संस्थेच्या परिसराची छायाचित्रे किंवा व्हिडिओ सोशल मीडियावर न पोस्ट करणे आणि दुसरी बंदी होती ती म्हणजे सरकारविरोधात सोशल मीडियावर पोस्ट न टाकणे, यावर निर्बंध लादले होते.

ABOUT THE AUTHOR

...view details