महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत आजपासून रेल्वेच्या निवडक स्थानकांवर तिकीट काऊंटर होणार सुरू

मुंबईत मर्यादित स्वरूपात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवरील आरक्षित गाड्यांचे काउंटर्स ओपन होणार आहेत. सध्या ज्या विशेष राजधानी गाड्या आणि दोनशे एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. फक्त त्याच गाड्यांचं आरक्षण या काऊंटरवर मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने आरक्षित गाड्यांचे काऊंटर सुरू करण्याची परवानगी रेल्वेच्या झोनल ऑफिसला पत्राद्वारे दिली आहे.

indian railway
indian railway

By

Published : May 22, 2020, 7:17 AM IST

मुंबई- लॉकडाऊनच्या दोन महिन्यानंतर देशात पहिल्यांदा इतक्या मोठया प्रमाणात ठप्प झालेली रेल्वे सेवा सुरू करण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे. अखेर येत्या 1 जूनपासून 200 एक्सप्रेस गाड्या धावणार आहेत. या गाड्यांची ऑनलाईन तिकीट बुकिंग गुरुवारी 21 मे पासून सकाळी 10 वाजल्यापासून आयआरसीटीसीच्या वेबसाईटवर सुरू झाली आहे. तर आज (22 मे) पासून रेल्वे स्थानकांवरही तिकीट बुकिंग सेवा सुरू होणार असल्याची माहिती रेल्वे मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.

मुंबईत मर्यादित स्वरूपात मध्य आणि पश्चिम रेल्वेच्या स्टेशनवरील आरक्षित गाड्यांचे काउंटर्स ओपन होणार आहेत. सध्या ज्या विशेष राजधानी गाड्या आणि दोनशे एक्सप्रेस चालवल्या जात आहेत. फक्त त्याच गाड्यांचं आरक्षण या काऊंटरवर मिळणार आहे. रेल्वे मंत्रालयाने आरक्षित गाड्यांचे काऊंटर सुरू करण्याची परवानगी रेल्वेच्या झोनल ऑफिसला पत्राद्वारे दिली आहे. तर, तिकीट रद्द केल्यानंतर रिफंडसाठीचे काऊंटर 25 मे पासून उघडले जाणार आहेत. मात्र, या दोन्ही काउंटर्सची वेळ मर्यादेत असणार आहे. तसेच प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळण्याचे आणि गर्दी न करण्याचे रेल्वेकडून आवाहन करण्यात आले आहे.

मुंबईत मध्य रेल्वेच्या या स्थानकांवर सुरू होणार तिकीट काऊंटर

सीएसएमटी - 4

एलटीटी - 3

दादर - 2

ठाणे - 2

कल्याण - 2

पनवेल 2

बदलापूर 1

मुंबईत पश्चिम रेल्वेच्या खालील स्थानकावर होणार तिकीट काऊंटर सुरू

चर्चगेट -2

मुंबई सेंट्रल - 2

वसई रोड - 2

ABOUT THE AUTHOR

...view details