मुंबई - नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर (Indian Navy Day) गेट वे ऑफ इंडिया (Gate way of India) येथे नौसेनेच्या जवानांनी गेल्या चार दिवसांपासून थरारक प्रात्यक्षिक केली. रेस्क्यू ऑपरेशन, एअर फायटींग, बँड पथक, सनई वाद्याने प्रेक्षकांची मने जिंकली. आज बिटिंग द रिट्रीट टॅटू सिरॅमनी कार्यक्रमाची सांगता झाली.
Indian Navy Day : पाहा नौसेना जवानांची थरारक प्रात्यक्षिके - राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील
नौसेना दिनाच्या पार्श्वभूमीवर (Indian Navy Day) गेट वे ऑफ इंडिया (Gate way of India) येथे नौसेनेच्या जवानांनी गेल्या चार दिवसांपासून थरारक प्रात्यक्षिक केली. रेस्क्यू ऑपरेशन, एअर फायटींग, बँड पथक, सनई वाद्याने प्रेक्षकांची मने जिंकली. आज बिटिंग द रिट्रीट टॅटू सिरॅमनी कार्यक्रमाची सांगता झाली.
चार दिवस केली प्रात्यक्षिके
जगात बलाढ्य नौसेना दल म्हणून भारतीय नौसेना दल ओळखला जातो. देशातील समुद्री सीमांचे सुरक्षेबरोबर आंतरराष्ट्रीय संबंध अधिक सद्ढ करण्यात भारतीय नौदलाचे योगदान अमूल्य असे आहे. आपल्या पराक्रमाने या दलाने नेहमीच प्रत्येक भारतीयाची मान गर्वाने उंचावली आहे. दरवर्षी ४ डिसेंबरला नौसेना दिवस साजरा करण्यात येतो. मुंबईचे मुख्य गेट असलेल्या गेट वे ऑफ इंडिया या सुप्रसिद्ध ठिकाणी नौसेना दलामार्फत या निमित्ताने चार दिवस प्रात्यक्षिक केली जातात. पाकिस्तान विरुध्दाच्या युध्दावेळी शत्रूशी केलेल्या लढतीचे दरम्यान स्मरण केले जाते. नौसेनेचे जवान आपल्या कलेचे प्रदर्शन करतात. आपत्कालीन स्थितीत नौसेनेमार्फत केले जाणारे रेस्क्यू ऑपरेशन, एअर फायटींग आदी थरारक प्रात्यक्षिके आणि परेड करण्यात आली. नौसेनेच्या ब्रास बँड पथकाने यावेळी उत्साहवर्धक धून वाजवून प्रेक्षकांची मने जिंकली. महिला जवानांनी ब्रास बँडच्या तालावर ठेका धरला. प्रेक्षकांनी टाळ्यांचा कडकडाट करत साथ देऊन ब्रास बँड पथकाचा जोश वाढवला.
हेही वाचा -Raju Shetty On Onion Prices : या 13 रूपयांमधून सरकारचा 13 वा घालावा का? राजू शेट्टी संतापले