महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

ओळख लपवण्यासाठी चोरीनंतर करायचे टक्कल, तीन चोरांना मुंबईतून अटक - मुंबई लेटेस्ट न्यूज

पोलिसांनी तीन चोरांना अटक केली आहे. पण हे साधेसुधे चोर नाहीत, चोरी केल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी या चोरांनी नामी शक्कल लढवली होती. हे चोर चोरी केल्यानंतर टक्कल करायचे, जेणेकरून पोलिसांना त्यांची ओळख पटू शकणार नाही. एवढंच नाहीतर पोलीस आम्हाला कधीच पकडू शकत नाही, असा या चोरांना विश्वास होता. मात्र अखेर या चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुंबई पोलिसांनी आवळल्या चोरांच्या मुसक्या
मुंबई पोलिसांनी आवळल्या चोरांच्या मुसक्या

By

Published : May 28, 2021, 4:47 PM IST

मुंबई - पोलिसांनी तीन चोरांना अटक केली आहे. पण हे साधेसुधे चोर नाहीत, चोरी केल्यानंतर पोलिसांपासून वाचण्यासाठी या चोरांनी नामी शक्कल लढवली होती. हे चोर चोरी केल्यानंतर टक्कल करायचे, जेणेकरून पोलिसांना त्यांची ओळख पटू शकणार नाही. एवढंच नाहीतर पोलीस आम्हाला कधीच पकडू शकत नाही, असा या चोरांना विश्वास होता. मात्र अखेर या चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे.

मुंबई पोलिसांनी आवळल्या चोरांच्या मुसक्या

तीन लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त

पोलिसांनी आधी आरिफ खाटीक वय 20 आणि रागावत चव्हाण वय 19 या दोन आरोपींना अटक केली. त्यांची चौकशी सुरू असताना पोलिसांना या गुन्ह्यातील मास्टर माईंड अब्दुल अली शेख वय 21 याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ सूत्र हलवत त्यालाही अटक केली. या चोरांची कसून चौकशी केली असता, चोरांनी त्यांच्या चोरीच्या पद्धतीचा खुलासा केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हे तिनही चोर वेगवेगळ्या पद्धतीनं चोरी करत होते. पोलिसांपासून बचाव करण्यासाठी हे चोर चोरी केल्यानंतर टक्कल करून घ्यायचे. जेणेकरून पोलिसांना त्यांची ओळख पटू शकणार नाही. अखेर पोलिसांनी या चोरांना अटक केली आहे. या चोरांकडून पोलिसांनी चार दुचाकी आणि 14 मोबाईल असा एकूण तीन लाख 20 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हेही वाचा -पंतप्रधानांच्या नाटकबाजीमुळेच भारतात कोरोनाची दुसरी लाट - राहुल गांधी

ABOUT THE AUTHOR

...view details