मुंबई - महाविकास आघाडीचे नेत्यांमध्ये कुरबुरी वाढल्या ( Mahavikas Aghadi Dissatisfaction ) आहेत. विकास निधी वाटप, आरक्षण किंवा अन्य मुद्द्यांवर सातत्याने मतमतांतरे आहेत. समन्वयाच्या अभावामुळे धुसफूस वाढली आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी समन्वय समितीने आज बैठक ( Maharashtra Mahavikas Aghadi Meeting ) बोलावली आहे. यावेळी जोरदार खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीतील नेते एकमेकांवर टिप्पणी करत असल्याचे दिसून येत आहे. खात्यांतर्गत मिळणारा विकास कामांचा निधी, ओबीसी आरक्षणासंदर्भातील माहितीबाबत काही नेते अनभिज्ञ आहेत. काँग्रेसच्या नेत्यांनी उघडपणे ही बाब बोलून दाखवली आहे. भाजपाकडून महाविकास आघाडीला सातत्याने टार्गेट केले जात ( Bjp Target Mahavikas Aghadi ) आहे. आघाडी सरकारच्या नेत्यांमधील वाढत्या असंतोषाचा फटका आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत बसू शकतो. आघाडीतील नेत्यांची नाराजी दूर करण्यासाठी समन्वय समितीची बैठक ( Maharashtra Mahavikas Aghadi Meeting ) बोलावली आहे.