मुंबई -मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील जुईनगर ते तुर्भे तुर्भे दरम्यान रोड ओव्हर ब्रिजच्या रुंदीकरणासाठी आणि प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट गर्डर लाँचिंगसाठी तीन दिवसीय रात्रकाली मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हा ट्रॅफिक ब्लॉक शुक्रवार, शनिवार आणि रविवारी रात्री असणार आहेत.
असा असणार मेगाब्लॉक -मध्य रेल्वे प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गावरील जुईनगर ते तुर्भे दरम्यान 800 MT रोड क्रेन वापरून सध्याच्या रोड ओव्हर ब्रिजच्या रुंदीकरणासाठी विद्यमान प्री-स्ट्रेस्ड काँक्रीट एफओबी गर्डर लाँचिंगसाठी शुक्रवारी, शनिवारी आणि रविवारी विशेष रात्रीचा ट्रॅफिक आणि पॉवर ब्लॉक घेण्यात करणार आहे. हा ब्लॉक सानपाडा-जुईनगर ते तुर्भे दरम्यान असणार आहे.