मलाड -मुंबईतील ( mumbai ) मालवणी परिसरात गेल्या तीन दिवसांत तीन खुनाच्या घटना समोर आल्या ( Murder in Malvani ) आहेत. तर गेल्या १५ दिवसांपासून बोलायचे झाले तर १५ दिवसांत ४ जणांची हत्या ( four murders in fiftheen days ) झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या प्रकरणी चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा लवकरात लवकर छडा लावावा अशी मागणी नागरिकांकडून व्यक्त केली जातेय.
पहिला खून -गुरूपौर्णिमेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजेच १४ जुलैला पहिला खून झाला होता. १४ जुलै रोजी मढ बेटावरील एका लॉजमध्ये ( Madh Island ) ही घटना घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, प्रियकराने प्रेयसीचा खून केला ( Boyfriend killed girlfriend ) होता. हे तिथल्या पहिल्या खूनाचे प्रकरण आहे. प्रियकर आणि प्रेयसीमधे वाद होते. त्यामुळे प्रियकराने प्रेयसीचा खून केल्याच समोर आले आहे.
दुसरा खून -दुसरी हत्या मालवणी गेट क्रमांक ८ ची आहे. येथे १५जुलै रोजी रात्री पती-पत्नीमध्ये भांडण ( Argument Between Husband And Wife ) झाले. पतीने रागाच्या भराता साला ग्राइंडरने पत्नीची हत्या ( Husband killed Wife )केली, घटनेनंतर मालवणी पोलिसांनी आरोपी महिलेच्या पतीला अटक केली आहे.