मुंबई - मुंबई सायन अँटोप हिल महाराष्ट्र नगर येथील 3 घरे आज सकाळी कोसळली. याठिकाणी ढिगाऱ्याखालून 9 जणांना बाहेर काढून सायन रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. त्या पैकी 3 जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.
घर कोसळले -
मिळालेल्या माहितीनुसार सायन अँटोप हिल महाराष्ट्र नगर येथील तळ अधिक एक मजली असलेली 3 घरे आज सकाळी कोसळली. घर कोसळल्याने ढिगाऱ्याखाली काही लोक अडकले होते. मुंबई अग्निशमन दल आणि पालिका कर्मचाऱ्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या 9 लोकांना बाहेर काढण्यात आले. त्यापैकी 7 जणांना सायन रूग्णालयात पाठवण्यात आले. या सातही जणांना डॉक्टरांनी तपासून त्यामधील 3 जणांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. 2 जणांनी रुग्णालयात दाखल होण्यास नकार दिला आहे. अमित मिश्रा 23 वर्ष, सुरेंद्र मिश्रा 59 वर्ष, पूनम शर्मा 28 वर्ष अशी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर ओपीडीमध्ये उपचार सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाकडून देण्यात आली आहे.