महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Bol Bachchan gang Robbery: ओळखीचे असल्याचे भासवत आवाज दिला अन् चाकूच्या धाकावर केली लुटमार - Bol Bachchan gang Robbery

चाकूचा धाक दाखवून ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या (Senior Citizen Robbery Mumbai) त्रिकुटाला मुलुंड पोलिसांनी (Mulund Police Station) अटक केली आहे. अटक आरोपींविरोधात नवघर, पंतनगर, भोईवाडा, विलेपार्ले , बाजारपेठ कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बांद्रा, सांताक्रुज, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे.

चाकूच्या धाकावर केली लुटमार
चाकूच्या धाकावर केली लुटमार

By

Published : Sep 24, 2022, 6:54 PM IST

मुंबई : चाकूचा धाक दाखवून ज्येष्ठ नागरिकाला लुटणाऱ्या (Senior Citizen Robbery Mumbai) त्रिकुटाला मुलुंड पोलिसांनी (Mulund Police Station) अटक केली आहे. अटक आरोपींविरोधात नवघर, पंतनगर, भोईवाडा, विलेपार्ले , बाजारपेठ कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बांद्रा, सांताक्रुज, मुंबई सेंट्रल रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. रमेश जयस्वाल(४४), नरेश जयस्वाल(३९), संजय बांगडे (४९) अशी आरोपींची नावे आहेत. (Bol Bachchan gang arrested in case of robbery)

चाकूचा धाक दाखवून ऐवज लुटला -मुलुंड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांतीलाल कोथिंबिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाण्यातील रहिवासी असलेले मधुकर बाळू दळवी (६०) हे ८ सप्टेंबर रोजी कामानिमित्त बाहेर पडले. दुपारी पावणे तीनच्या सुमारास मॅरेथॉन बिल्डिंगखाली असलेल्या मोकळ्या जागेत एस एल रोड, मुलुंड पश्चिम या ठिकाणी आले असता त्यांना एका अनोळखी इसमाने आवाज दिला. ओळखीचे असल्याचे सांगून बोलायला सुरुवात केली. त्यापाठोपाठ आणखीन दोन अनोळखी व्यक्ती तेथे आल्या. दळवी यांना चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडील सोन्याचे ब्रेसलेट, सोन्याची चैन, तीन सोन्याच्या अंगठ्या व पाकिटामधील २ हजार रुपये रोख रक्कम काढून घेतली. तसेच यायाबाबत कुणाकडे वाच्यता केल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. दळवी यांनी तात्काळ मुलुंड पोलिसांत धाव घेत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा नोंदवत सपोनि गणेश मोहिते व गुन्हे प्रकटीकरण पथकाने तपास सुरू केला.

चोरीस गेलेली मालमत्ता -
1) किंमत रुपये 1,00,000/- किमतीचे सोन्याचे हातातील एक ब्रेसलेट वजन 22 ग्रॅम
2) किंमत रुपये 60,000/- किमतीची गळ्यातील सोन्याची एक चैन वजन 15 ग्रॅम
3) किंमत रुपये 25,000/- किमतीच्या सोन्याच्या 3 अंगठ्या वजन 07 ग्रॅम
4) रोख रक्कम 2,000/-
एकूण कि. रुपये- 1,87,000/-

आरोपींना ठोकल्या बेड्या -घटनास्थळाचे सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता त्यामध्ये अभिलेखावरील आरोपी रमेश जयस्वाल, नरेश जयस्वाल, संजय बांगडे हे दिसून आले. त्यानुसार पोलिसांनी त्यांचा शोध सुरू केला. ते नवी मुंबईतील एका लॉजमध्ये थांबल्याची माहिती मिळताच पथकाने त्यांना बेड्या ठोकल्या. त्यांना २५ तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. यामध्ये आरोपी नरेश जयस्वाल याला आजारपणाच्या कारणावरून न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस कोठडीमध्ये असलेल्या दुकलीकडून अधिक तपास सुरू आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details