महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Mumbai Municipal Corporation Schools : मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षकाविना - Mumbai public schools

मुंबई महापालिकेच्या शाळांमध्ये हजारो विद्यार्थी शिक्षकाविना Mumbai Municipal Corporation schools without teachers;सीबीएससी शाळा सुरू केल्याचा उलटा परिणाम मुंबई पब्लिक स्कूलवर Implications for Mumbai's public schools होत आहे. शाळांमध्ये Mumbai Municipal Corporation schools सीबीएससी आयसीएसी केंब्रिज संलग्न अशा शाळा महानगरपालिकेने सुरू केल्या खऱ्या. मात्र, त्याची दुसरी बाजू अद्यापही समोर आलेली नाही.

Mumbai Municipal Corporation Schools
मुंबई महापालिका शाळा

By

Published : Sep 4, 2022, 12:15 PM IST

Updated : Sep 4, 2022, 12:51 PM IST

मुंबई -मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये Mumbai Municipal Corporation schools सीबीएससी आयसीएसी केंब्रिज संलग्न अशा शाळा महानगरपालिकेने सुरू केल्या खऱ्या. मात्र, त्याची दुसरी बाजू अद्यापही समोर आलेली नाही. ती म्हणजे मुंबई महानगरपालिकेला शिक्षकांची कमतरता shortage of teachers in Mumbai Municipal Corporation आजही आहे आधी होती .नव्या सीबीएससी संलग्न शाळांसाठी मुंबई महानगरपालिकेने आपल्याच इंग्रजी शाळांमधील शिक्षक इकडे आणले. त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या हजारो विद्यार्थ्यांना मुलांना शिक्षकच no teachers in Mumbai Municipal Corporation schools नाही . परिणामी मल्टिलेयर टिचिंग अर्थात एकाच वर्गखोलीत दोन इयत्तांच्या विद्यार्थ्यांना बसवले जाते . हा तर बालकांवर अन्याय असल्याची टीका शिक्षण हक्क वर्तुळातून होत आहे. शिक्षण हक्क कायदा त्याचे देखील उल्लघन असल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

अक्षय पाठक यांची प्रतिक्रिया

विद्यार्थ्यांना खाजगी शाळांकडे जाण्यापासून रोखण्यासाठी सीबीएसई शाळा -खाजगी शाळांकडे पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ओढा अधिक वाढत आहे. देशाचे आणि राज्याचे शिक्षण धोरण कितीही अद्ययावत झालं किंवा बदललं. तरीही सक्तीचं मोफत आणि मातृभाषेसह इंग्रजीतही दर्जेदार शिक्षण मिळणे मुश्किल आहे. याबाबतीत शासन आणि मुंबई महानगरपालिका गेल्या दहा वर्षात यशस्वी ठरलेली नाही. त्यामुळे पालकांचा ओढा खाजगी शाळाकडे आहे. गरीब व अल्प उत्पन्न गटातले पालक नाईला जास्त खाजगी शाळेकडे वाट धरतात. महानगरपालिकेच्या शाळातील विद्यार्थी खाजगी शाळांमध्ये जाऊ लागले ते रोखण्यासाठी सी बी एस सी शाळा सुरू केल्या. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने निवडक 15 शाळा या सीबीएससी संलग्न केल्या. त्यातल्या दोन आयसीएससी आणि दोन केंब्रिज संलग्न केलेल्या आहेत. 2021ते 2022 या काळात या शाळा सुरू करण्यात आल्या.

हजारो विद्यार्थी शिक्षकाविना

महापालिकेच्या तीस हजार विद्यार्थ्यांना शिक्षकच नाही -मुंबई महानगरपालिकेच्या 84 शाळा मुंबई पब्लिक स्कूल नावाने सुरू केल्या आहेत. या शाळा सर्व इंग्रजी माध्यमाच्या शाळा आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या तत्कालीन आयुक्तांच्या 17 नोव्हेंबर 2006 च्या पत्रानुसार या शाळा सुरू करण्यात आल्या. या शाळांमध्ये आरटीईच्या नियमानुसार तीस विद्यार्थ्याल एक शिक्षक असे प्रमाण सर्वत्र पालन केले जात नाही. त्यामुळे दर्जेदार शिक्षण विद्यार्थ्यांना मिळत नाही. आधीच मुंबईच्या सार्वजनिक शाळांमध्ये महापालिकेच्या शिक्षकांची कमतरता असताना यातील 80 ते 100 शिक्षक नवीन सीबीएससी,आयसीएससी, केंब्रिज शाळेत वळवले आहेत. मनपाच्या सुमारे ३ लाख विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे याची हमी मनपाची आहे. आजही १,००० शिक्षकांची कमतरता मनपा शाळांमध्ये आहे. म्हणजे ३० विद्यार्थ्यांमागे एक शिक्षक ह्या प्रमाणे ३०, हजार विद्यार्थ्यांना शिक्षक नाही ; अशी टीका अखिल भारत शिक्षा अधिकार मंच कार्यकर्ते अक्षय पाठक यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना केली आहे. तर शिक्षण अधिकारी राजेश कंकाळ यांनी सांगितले कि, ''मनपा नियमानुसार शिक्षक भरती करत आहे. तसेच सर्व शाळामध्ये मोफत सक्तीचे शिक्षण देत आहे. ''

मुंबई महापालिका शाळा


पालक व्यथित - मुंबईच्या सार्वजनिक शाळांचे संक्षिप्त नाव एम. पी. एस असे आहे. या शाळांमध्ये पहिली ते दहावी इंग्रजीचे शिक्षण महापालिका देते . मात्र या शाळांमध्ये पहिली दुसरी, तिसरी, चौथी, पाचवी अशा प्राथमिक स्तरावरील बहुतेक वर्गांना दोन वर्ग मागे एक शिक्षक असे प्रमाण असल्यामुळे दर्जेदार शिक्षण मिळू शकत नाही . त्यामुळे पालक आपल्या मुलांना दर्जेदार शिक्षण येथे मिळत नाही. म्हणूनच देखील खाजगी शाळेमध्ये घालण्यासाठी मजबूर होतात, असे विश्लेषण मुंबई शिक्षक सभेचे नेते अभिषेक यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना सांगितले. तसेच मुंबई शिक्षक सेना या संघटनेचे नेते के. पी, नाईक यांनी ईटीव्ही भारत सोबत बोलताना माहिती दिली की," मुंबई पब्लिक स्कूल ज्या उद्देशाने महापालिकेने सुरू केले तिथेच शिक्षक नाही. त्यात कंत्राटी शिक्षक दिला तर ते चांगलं शिकवू शकत नाही. आणि इथेच धड शिक्षक नाही आणि ते शिक्षक काढून तुम्ही सीबीएससी आणि आयसीएससी व केंब्रिज संलग्न मनपा शाळांना देतात. म्हणजे इकडे धड नाही तिकडे धड नाही, 'आगीतून फुफाट्यात' गेल्यासारखी मुलांची स्थिती झालेली आहे अशी खंत त्यांनी व्यक्त केली. तर पालक मुरलीधर मांडवकर म्हणाले, आमची मुल महापालिका शाळेत विक्रोळी येथील एमपीएस शाळेत जातात. मात्र शिक्षक नाही. त्यांना दर्जेदार शिक्षण कसे मिळणार? तसेच दोन वर्गाच्या मुलांना एकाच खोलीत बसावे लागते. हा अन्याय असल्याचे त्यांनी ईटीव्ही भारत सोबत संवाद साधताना आपल्या भावना व्यक्त केल्या.

हेही वाचा -Hema Malini Pune Festival : 'ड्रिम गर्ल'ने पुणे फेस्टिव्हलमध्ये जिंकली रसिकांची मने

Last Updated : Sep 4, 2022, 12:51 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details