महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत एकाच दिवसात विनामास्क फिरणाऱ्यांकडून ४५ लाख रुपयांची वसुली

ज्या व्यक्ती मास्क वापरत नाहीत, वारंवार सांगून आणि कारवाई करूनही कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत, अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.

face mask
face mask

By

Published : Feb 24, 2021, 7:37 PM IST

Updated : Feb 25, 2021, 11:16 AM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेने विनामास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्या अनुषंगाने रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह, गर्दीच्या ठिकाणी कारवाई करण्यात येत आहे. ज्या व्यक्ती मास्क वापरत नाहीत, वारंवार सांगून आणि कारवाई करूनही कोरोना नियमांचे उल्लंघन करत आहेत, अशा लोकांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली. मुंबई २० एप्रिल ते २२ फेब्रुवारी दरम्यान १६ लाख ३५ हजार १२९ लोकांवर कारवी करून ३३ कोटी ६ लाख ३३ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

मुंबईत एकाच दिवसात विनामास्क फिरणाऱ्यांकडून ४५ लाख रुपयांची वसुली

एकाच दिवसात २३ हजार व्यक्तींवर कारवाई

मुंबईत कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालिकेने विनामास्क आढळून येणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई सुरू केली आहे. त्या अनुषंगाने रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्येदेखील धडक कारवाई करण्यात येऊन कोविडविषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. २२ फेब्रुवारी रोजी महापालिकेद्वारे १४ हजार ६०६, मुंबई पोलीस दलाद्वारे ७,९११, मध्य रेल्वेद्वारे २३८, पश्चिम रेल्वेद्वारे २२१ अशा एकूण २२ हजार ९७६ व्यक्तींवर 'विनामास्क’ विषयक कारवाई करण्यात येऊन प्रत्येकी रुपये २०० यानुसार एकूण रुपये ४५ लाख ९५ हजार २०० एवढी दंडवसुली करण्यात आली आहे.

कुर्ला, बोरिवलीत सर्वाधिक कारवाई

कोरोना रुग्णसंख्या वाढत असल्याने पालिका आयुक्त इक्बालसिंग चहल यांच्या आदेशानुसार सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रात कोविडविषयक प्रतिबंधात्मक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या रेस्टॉरंट, क्लब, जिमखाना, चित्रपटगृह इत्यादींमध्ये धडक कारवाई करण्यात आली आहे. महापालिकेद्वारे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान महापालिकेच्या २४ विभागांपैकी ‘एल’ विभागात सर्वाधिक म्हणजे ८७५ व्यक्तींवर दंडात्मक कारवाई करण्यात येऊन त्यांच्याकडून रुपये १ लाख ७५ हजार इतका दंड वसूल करण्यात आला आहे. या खालोखाल बोरिवली येथील ‘आर मध्य’ विभागात ८१९ व्यक्तींकडून रुपये १ लाख ६३ हजार ८०० इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

विभागवार कारवाई

मुंबई महापालिकेच्या झोन क्रमांक एकमध्ये २ लाख ३५ हजार ५७४ लोकांवर कारवाई करून ४ कोटी ७६ लाख ८५ हजार ३००, झोन क्रमांक २मध्ये २ लाख ९४ हजार २२७ लोकांवर कारवाई करून ५ कोटी ९१ लाख ७६ हजार ७००, झोन क्रमांक ३मध्ये २ लाख २७ हजार १२४ लोकांवर कारवाई करून ४ कोटी ६६ लाख ८७ हजार ८००, झोन क्रमांक ४मध्ये २ लाख ५३ हजार ३६६ लोकांवर कारवाई करून ५ कोटी १२ लाख १८ हजार ६००, झोन क्रमांक ५मध्ये १ लाख ७८ हजार १७७ लोकांवर कारवाई करून ३ कोटी ५८ लाख ५२ हजार १००, झोन क्रमांक ६मध्ये २ लाख ७ हजार ७५३ लोकांवर कारवाई करत ४ कोटी १५ लाख ९५ हजार २०० तर झोन क्रमांक ७मध्ये २ लाख २० हजार ९२१ लोकांवर कारवाई करत ४ कोटी ४८ लाख २० हजार ३०० रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. मुंबई पोलिसांकडून १७ हजार ५२८ लोकांवर कारवाई करत ३५ लाख ५ हजार ६०० तसेच रेव्ह हद्दीतही कारवाई करण्यात आली आहे. आतापर्यंत एकूण १६ लाख ३५ हजार १२९ लोकांवर कारवाई करून ३३ कोटी ६ लाख ३३ हजार ४०० रुपये इतका दंड वसूल करण्यात आला आहे.

मास्क लावण्याचे पालिकेचे आवाहन

'कोविड–१९'च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाद्वारे देण्यात आलेल्या निर्देशांनुसार सार्वजनिक ठिकाणी, गर्दीच्या ठिकाणी वावरताना प्रत्येकाने आपल्या चेहऱ्यावर 'मास्क' लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच 'मास्क'चा वापर न करणाऱ्या नागरिकांवर रुपये २०० एवढी दंड आकारणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. यानुसार बृहन्मुंबई महापालिकेद्वारे 'मास्क' वापरण्याविषयक जनजागृती सातत्याने करण्यासोबतच याबाबत नियम न पाळणाऱ्या किंवा चेहऱ्यावर मास्क न लावणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई एप्रिल २०२०पासून नियमितपणे करण्यात येत आहे. नागरिकांनी घराबाहेर पडताना आवर्जून 'फेसमास्क' घालूनच बाहेर पडावे, असे आवाहन बृहन्मुंबई महानगरपालिका प्रशासनाद्वारे करण्यात आले आहे.

Last Updated : Feb 25, 2021, 11:16 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details