महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Lalbagcha Raja Ganeshotsav यंदा लालबागच्या राजाचे विशेष आकर्षण असणार अयोध्येतील श्रीराम मंदिर, बाप्पाच्या आगमनाची जोरदार तयारी - 89th Year of Lalbagcha Raja

मुंबईतील Ganesh Utsav in Mumbai प्रसिद्ध मंडळापैकी एक असलेल्या लालबागचा Lalbagcha Raja Mandal राजाचे Lalbagcha Raja Ganeshotsav मुंबईत विशेष महत्त्व आहे. संपूर्ण जगात विख्यात असलेल्या लालबागचा राजा मंडळाचे यंदा 89 वे वर्ष 89th Year of Lalbagcha Raja आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या 14 दिवसांवर येऊन ठेपले आहे. मुंबईत गणेशोत्सवाची विशेष धामधूम असते. मुंबईत गणेशाच्या मोठमोठ्या मूर्ती विशेष आकर्षण असते. या निमित्ताने जगप्रसिद्ध लालबागचा राजाच्या तयारीचा घेतलेला आढावा.....

Lalbagcha Raja Ganeshotsav
यंदा लालबागच्या राजाचे विशेष आकर्षण

By

Published : Aug 18, 2022, 12:50 PM IST

मुंबई संपूर्ण जगात विख्यात असलेल्या लालबागचा राजा Lalbagcha Raja Mandal मंडळाचे Lalbagcha Raja Ganeshotsav यंदा 89 वे वर्ष 89th Year of Lalbagcha Raja आहे. आपल्या लाडक्या बाप्पाचे आगमन अवघ्या 14 दिवसांवर येऊन ठेपले आहे. मुंबईत Ganesh Utsav in Mumbai गणेशोत्सवाची विशेष धामधूम असते. मुंबईत गणेशाच्या मोठमोठ्या मूर्ती विशेष आकर्षण Big Idols of Ganesha is Special Attraction असते. त्यात लालबागच्या राजाची विशेष ओळख आहे. नवसाला पावणारा गणपती म्हणून लालबागची ओळख असून कोट्यावधी भाविकांची श्रद्धा याठिकाणी जुळलेली आहे. श्रध्देसह या ठिकाणाचा देखावा बघण्यासाठी दरवर्षी भाविकांची मोठी गर्दी होते. या निमित्ताने जगप्रसिद्ध लालबागचा राजाच्या तयारीचा घेतलेला आढावा.....

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्षांनी दिली माहिती लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले. दरवर्षी गणेशभक्तांमध्ये गणेशोत्सवाचा एक वेगळाच आनंद असतो. त्यानुसार भक्तांकडून जोरदार तयारी सुरू असते. अशातच मुंबईतील प्रसिद्ध मंडळापैकी एक असलेल्या लालबागचा राजाचे मुंबईत विशेष महत्त्व आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनाचे सावट असल्यामुळे मंडळाने अत्यंत साधेपणाने गणेशोत्सव साजरा केला. तसेच, सामाजिक कार्यदेखील केले. 2020 मध्ये महाराष्ट्र दान शिबिर प्लाज्मा शिबिर राबवण्यात आले होते. त्याला प्रतिसाद चांगला लाभला होता. त्यानंतर 2021 मध्ये शहीद जवानांना मदत म्हणून घरी जाऊन दोन लाख रुपयांची मदत देण्यात आली.

लालबागच्या राजाकडून पोलीस दलाला मदत मुंबई पोलीस दलातील कोरोनामुळे मरण पावलेल्या पोलिसांच्या कुटुंबीयांना एक लाख रुपयांची मदत लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळातर्फे देण्यात आली. अशा प्रकारे लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ कोरोनाचे सावट असूनही सामाजिक कार्य करण्यात मागे पडले नव्हते यंदा मात्र धूमधडाक्यात आणि मोठ्या जल्लोषात लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळ गणेशोत्सव साजरा करणार आहे.

नवसाला पावणारा गणपती, राज्यभरातून भाविक दर्शनाला राज्यभरातून भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत असतात. तेथे अनेक भाविक अहोरात्र सेवा करीत असतात. तसेच मुखदर्शनाची रांग आणि नवसाचा रांगेची तयारी करण्यात येत आहे. भाविकांना गैरसोय होणार नाही याचीदेखील दखल घेतली जाते. नवसाच्या रांगेत तासान् तास उभ्या राहणाऱ्या भाविकांसाठी चहा नाश्ताची सोय केली जाते. यंदादेखील अशाच प्रकारे योजना असणार आहे. लालबागच्या राजाची प्रसन्न मूर्ती हे नेहमीच सर्वांच्या आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरते. त्याचबरोबर येथील देखावे नेहमीच वैशिष्ट्यपूर्ण आणि एका थीमवर आधारीत असतात.

यंदा अयोध्येच्या राम मंदिरात विराजमान होणार लागबागचा राजा त्याचप्रमाणे लालबागचा राजाचे मुख्य प्रवेशद्वार अयोध्या नगरीतील सर्वात मोठ्या अशा उभारल्या जाणाऱ्या श्रीराम मंदिराची असणार आहे. लालबागच्या राजाच्या व्यासपीठावरदेखील प्रभू श्रीरामचंद्रांचा मंदिराच्या प्रतिकृती भाविकांच्या दर्शनासाठी असणार आहे. लालबागच्या राजाच्या स्वागतासाठी गेले तीन महिने पूर्वतयारी सुरू झालेली आहे. हळूहळू सर्व तयारी अंतिम टप्प्यात येत असून, भाविकांना विनंती आहे की, त्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आपल्या लाडक्या राजाचे दर्शन घ्यावे, अशी विनंती लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळासाहेब कांबळे यांनी ईटीव्ही भारतशी बोलताना सांगितले.

हेही वाचा Bombay High Court ठाकरे सरकारचे निर्णय स्थगिती याचिकेवर शिंदे सरकारला दोन आठवड्यांचा अवधी, उच्च न्यायालयाचे निर्देश

ABOUT THE AUTHOR

...view details