महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

बीडीडी चाळ वासियांचे कसे असेल नवे घर?, जाणून घ्या - mumbai latest

मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचे बांधकाम होणार आहे. याचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि खासदार शरद पवार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जांभोरी मैदानात करण्यात आला.

बीडीडी चाळवासियाचे नवे घ
बीडीडी चाळवासियाचे नवे घ

By

Published : Aug 1, 2021, 5:02 PM IST

मुंबई -मुंबईच्या मध्यवर्ती भागात वसलेल्या वरळी येथील बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील पुनर्वसन इमारतींचे बांधकाम होणार आहे. याचा शुभारंभ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आणि खासदार शरद पवार व गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत जांभोरी मैदानात करण्यात आला. बीडीडी चाळ वासियांसाठी बांधण्यात येणारे घर कसे असेल हे जाणून घेतले आमचे प्रतिनिधी अक्षय गायकवाड यांनी.

बीडीडी चाळ वासियांचे कसे असेल नवे घर?, जाणून घ्या

भूकंप रोधक असणार पुनर्वसन इमारती

वरळी येथे सर्वाधिक म्हणजे १२१ चाळी असून वरळी बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पात पुनर्वसनातून ९ हजार ६८९ पुनर्वसन सदनिका (निवासी ९३९४ + अनिवासी २९५) बांधण्यात येणार आहेत. या प्रकल्पात तळ + ४० मजल्यांच्या ३३ पुनर्वसन इमारती बांधल्या जाणार असून रुग्णालय, वसतिगृह, शाळा, जिमखाना इत्यादी सुविधांकरिता स्वतंत्र इमारतींची उभारणी केली जाणार आहे. नमुना सदनिकेचे बांधकाम पूर्ण झाले आहे. प्रत्येक सदनिकांमध्ये ८०० बाय ८०० मिलिमीटरच्या व्हिट्रिफाईड टाईल्स बसविण्यात येणार असून खिडक्यांकरिता पावडर कोटिंगचे अल्युमिनियम फ्रेमचा वापर केला जाणार आहे. प्रत्येक इमारतीमध्ये ३ पॅसेंजर लिफ्ट, १ स्ट्रेचर लिफ्ट व १ फायर लिफ्टची सुविधा असणार आहे. पुनर्वसन क्लस्टरमध्ये मलनिःस्सारण प्रकल्प, सौर ऊर्जा, रेन वॉटर हार्वेस्टिंग या पर्यावरण पूरक सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. प्रत्येक पुनर्वसन इमारतीत तळ + ६ मजली पोडियम पार्किंग व दोन प्रशस्त जिने असणार आहेत. विशेष म्हणजे या सर्व पुनर्वसन इमारती भूकंप रोधक असणार आहेत.

पुनर्वसनातून 500 चौरस फुटाची सदनिका विनामूल्य मिळणार

या चाळी आज अत्यंत जर्जर अवस्थेत आहेत म्हणूनच शासनाने बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पाचे नियोजन आखले आहे. पिढ्यानपिढ्या 160 चौरस फुटाच्या छोट्याशा घरातून 500 चौरस फुटाची अत्याधुनिक सोयीसुविधा असलेली सदनिकेत हे रहिवाशी जाणार आहेत. त्याचबरोबर सर्व सोयीसुविधांनी युक्त एक टाऊनशिप निर्माण होणार आहे.

दुसऱ्यांदा झाले उद्घाटन
२१ एप्रिल २०१७ रोजी नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग बीडीडी चाळ प्रकल्पाचा भूमिपूजन समारंभ वरळीच्या जांबोरी मैदानावर फडणवीस यांच्या हस्ते झाला होता. त्यावेळी वरळी बीडीडी चाळ प्रकल्पातील पुनर्वसनाच्या प्रस्तावीत इमारतीच्या भूखंडाची पूजा तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आली होती.

पोलीस दलातून सेवानिवृत्त झालेले अथवा दिवंगत पोलीस 2010 च्या अगोदरच्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पांतर्गत कायमस्वरूपी निवासस्थाने उपलब्ध ही होणार आहेत.

हेही वाचा- 'झिका'चा पहिला रुग्ण आढळला, मात्र चिंतेचे कारण नाही; वाचा, आरोग्यमंत्री काय म्हणाले?

ABOUT THE AUTHOR

...view details