मुंबई -पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात दरम्यान राजकारणातील घराणेशाहीवर बोट ठेवल आहे. केवळ राजकीय घराण्यातला व्यक्ती आहे त्यामुळे राजकारणात संधी मिळते त्यामुळे आता देशामध्ये घराणेशाही चालणार नाही कर्तुत्ववान असेल त्यालाच राजकारणात पुढे यायची संधी मिळावी असे संकेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले आहेत Nepotism In Regional Parties त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या राजकारणातील घराणेशाहीवरच्या वक्तव्यावर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत
राजकीय अस्तित्व संपवण्याचा हा डाव खासकरून देशातील प्रादेशिक पक्षांमध्ये कुटुंबांचे प्रभुत्व पाहायला मिळते जवळपास प्रत्येक राज्यामध्ये प्रादेशिक पक्षाची एक वेगळी अस्मिता आहे त्या अस्मितेवर आधारावर या प्रादेशिक पक्षांची निर्मिती झाली असून पक्षांमध्ये एखाद्या विशिष्ट कुटूंबाचा प्रभुत्व जाणवत त्याच कुटुंबाच्या सदस्याकडे त्या पक्षाची धुरा असलेली पाहायला मिळते त्या पक्षाच्या इतर नेतेमंडळी पक्षाच्या सर्वोच्च स्थानी पोहताना फारच कमी वेळा पाहायला मिळते त्यामुळे राजकारणातील घराणेशाही संपुष्टात आणायची आहे का? किंवा भारतीय जनता पक्षाच्या विरोधात असलेल्या राजकीय कुटुंबांचे राजकीय अस्तित्व संपवण्याचा हा डाव आहे? याबाबतही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे
शिवसेना महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांमध्ये घराणेशाही सुरू असल्याचा आरोप सातत्याने भारतीय जनता पक्षाकडून करण्यात आला आहे महाराष्ट्र शिवसेना या पक्षाची धुरा ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे आली आता आदित्य ठाकरे राजकारणात सक्रिय झाले असून पक्ष ते सांभाळतील अशीच चिन्ह आहेत
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा पक्ष सुरू केला असून आता शरद पवारांचे पुतणे अजित पवार आणि मुलगी सुप्रिया सुळे यांचे पक्षांमध्ये सर्वात जास्त वजन आहे मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजकारणातील घराणेशाहीवर बोट ठेवल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनीही देशात घराणेशाही नाही तर लोकशाही आहे कर्तृत्व असेल तरच एखादी व्यक्ती जनतेच प्रतिनिधित्व करू शकेल ज्यांना राजकीय पार्श्वभूमी आहे अशा कुटुंबातील सदस्यांना राजकारणात आपल्या कर्तुत्वावर काम कराव असे वाटत असेल तर लोकशाहीने दिलेला त्यांना तो अधिकार आहे त्या व्यक्तीच्या कर्तुत्वावर विश्वास ठेवून जनतेने त्यांना निवडून देत असेल तर ही लोकशाही असल्याचे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वक्तव्याचा खंडन केले आहे
देशभरात कोणत्या राजकीय पक्षात घराणेशाहीचा आरोप होतो?तामिळनाडू डीएमके पक्ष करुणानिधी यांच्या कुटुंबाचा प्रभाव पक्षावर असून त्यांच्यानंतर एम के स्टॅलिन यांचे प्रभुत्व या पक्षावर आहे एमके स्टॅलिन आता तामिळनाडूचे मुख्यमंत्री देखील आहेत
आंध्रप्रदेश- तेलगू देसम पक्ष आंध्र प्रदेश मधील चंद्रबाबू नायडू यांच्या कुटुंबाचा तेलगू देसम पक्षावर प्रभुत्व आहे तर तेथेच वाय एस आर पक्षाचा मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी यांचा दबदबा आहे
तेलंगणा- तेलंगणा राष्ट्र समिती पक्ष तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा तेलंगणा राष्ट्र समिती पक्षावर पूर्णपणे नियंत्रण आहे त्यांचे कुटुंबीय पक्षाची विविध महत्त्वाची पद भूषवत आहेत
कर्नाटक- जनता दल सेक्युलर या पक्षावर देवेगौडा कुटुंबाचे प्रभुत्व आहे एच के देवेगौडा ते पक्षाचे ज्येष्ठ नेते त्यांचे पुत्र कुमार स्वामी हे राज्याचे माजी मुख्यमंत्री राहिले आहेत
ओडीसा - बिजू जनता दल पक्षावर पटनायक कुटुंबाचा प्रभुत्व असून जेष्ठ नेते विजू पटनायक नंतर मुख्यमंत्री नवीन पटनायक यांनी पक्षाची सर्व सूत्रे आपल्या हातात घेतली आहेत