मुंबई -हे सरकार खोटारडे आहे, हे जेव्हा तोंड उघडतात तेव्हा खोटंच बोलतात, अशी प्रतिक्रिया बॉलिवूड दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी दिली आहे. ते मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावर सुरू असलेल्या आंदोलनादरम्यान ते बोलत होते. जेएनयूमध्ये पाच जानेवारी रोजी झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, मुंबईमध्ये 24 तासांहून अधिक काळ आंदोलन सुरू आहे.
जेएनयूमधील हल्ल्याविरोधात मुंबईमध्ये सुरू असलेल्या आंदोलनात बॉलिवूडमधील सेलिब्रिटींनीही आपला सहभाग नोंदवला. तसेच दुपारी काही नेत्यांनीही या आंदोलकांना भेट दिली. बॉलिवूडमधील प्रसिद्ध दिग्दर्शक अनुराग कश्यपही या आंदोलनांमध्ये सक्रियरित्या सहभाग घेत आहेत. बांद्र्याला सुरू असलेल्या एका आंदोलनामधून ते 'गेटवे' समोरील आंदोलनात सहभागी होण्यासाठी आले होते. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांसोबत घोषणाबाजीही केली.
यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते म्हणाले, की आपण ज्या लोकांविरोधात लढत आहोत, ते खरंतर खूपच अशिक्षित आहेत. त्यांना आपल्या अशिक्षित असण्याबद्दल लाज वाटते, म्हणून ते आपण शिक्षित असल्याचा दिखावा करतात. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की या तरुण मुलांची उर्जा पाहून मलाही उर्जा मिळाली. मी बांद्र्यामध्ये आंदोलन करत होतो, इथल्या आंदोलनाचे व्हिडिओ पाहून इथे आलो.
जेएनयूमधील हल्लेखोर सरकारचेच लोक..