मुंबई - महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation ) बैठकांमध्ये विषय एकमताने मंजूर करायचे आणि बाहेर येऊन त्याच्यावर बोंबाबोंब करायची, हाच खेळ सातत्याने करणाऱ्या भाजपची प्रत्येक भूमिका ही फक्त आणि फक्त शिवसेना द्वेषाने पछाडलेली आहे. ( Standing Committee Chairman ) नायर रुग्णालयातील घटनेला राजकीय वळण देऊन भाजपने संवेदनशीलतेला आणि माणुसकीला देखील काळिमा फासली आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी दिली आहे.
घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न
राज्यात राजकीय समीकरण बदलल्यावर भाजपकडून शिवसेनेत आरोप प्रत्यारोप सुरू आहेत. ( BJP Shiv Sena ) महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या आरोप प्रत्यारोपात वाढ झाली आहे. ( BJP ) आज आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांच्यावर आरोप केले आहेत. याला महापौर किशोरी पेडणेकर व स्थायी समिती अध्यक्ष यशवंत जाधव यांनी पत्रकार परिषद घेऊन उत्तर दिले. यावेळी बोलताना, महानगरपालिका सभागृह प्रसंगी कुणीही गुंड बोलावलेले नाहीत. ज्यांचा संदर्भ आशिष शेलार यांनी दिला आहे, ते आमचे शिवसैनिक असून ते प्रत्येक नगरसेवकाबरोबर असतातच. ( Yashwant Jadhav criticizes BJP ) आम्ही सभागृहाबाहेर पडत असताना भाजपने महिला नगरसेविकांना पुढे करून आमच्या नावे शिवराळ भाषेत टिप्पणी केली. भाजपच्या काही नगरसेविका ह्या शिवसेना नगरसेवकांच्या अंगावर धावून जात होत्या. भाजपच्या अकार्यक्षम पुरुष नगरसेवकांनी महिलांना पुढे करून घाणेरडे राजकारण करण्याचा प्रयत्न केला अशी टीका जाधव यांनी केली आहे.
आमच्याकडून आक्रमकपणा शिकून घ्यावा
आशिष शेलारांनी आम्हाला सभागृहातील शिस्त, कायदे आणि नियम शिकवू नयेत. विधानसभा अध्यक्षांच्या दालनात घुसून गैरवर्तन केल्यामुळे आणि असंवैधानिक भाषा वापरल्यामुळे ते स्वतः आणि भाजपचे १२ आमदार विधानसभेतून निलंबित झाले आहेत. त्यांनी आमच्याबद्दल गुंडगिरीची भाषा वापरावी आणि आम्हाला संस्कारांचे धडे द्यावेत, यासारखा दुसरा विनोद नाही. आक्रमकपणा आणि गुंडागर्दी यात फरक आहे. आम्ही आक्रमक आहोत आणि शेलारांनी विधिमंडळात केली त्याला गुंडागर्दी म्हणतात. भाजपने आमच्याकडून आक्रमकपणा शिकून घ्यावा असही जाधव म्हणाले आहेत.
"गळा दाबीन" असे मी म्हटलेच नाही
"गळा दाबीन" असे मी म्हटलेच नाही. नायर रुग्णालयात घडलेली घटना गंभीर आहे. तेथील कर्मचाऱ्यांनी केलेला निष्काळजीपणा अक्षम्य आणि चीड आणणारा आहे. तिथे कुणीही सामान्य माणूस असता तरी त्याने संबंधित कर्मचाऱ्यांचा गळा दाबला असता, असे मी म्हणालो. ( Standing Committee Chairman ) कर्मचाऱ्यांचे वर्तन इतके चीड आणणारे होते, ते इवलेसे बाळ वेदनांनी तडफडत होते आणि असंवेदनशील कर्मचारी बघ्याची भूमिका घेऊन होते, ही पराकोटीची असंवेदनशीलता आहे, अशी चीड आणणारी ही घटना आहे, असे माझे म्हणणे होते. भाजप या मुद्द्याचा नको तितका बाऊ करीत आहे. आता आम्ही आमच्या संतप्त भावना कोणत्या शब्दांत व्यक्त करायच्या? आज शेलारांनी "निजवले" असा शब्दप्रयोग केला आहे. तो कोणत्या शिष्टाचारात बसतो? असा प्रश्न जाधव यांनी उपस्थित केला आहे.
भाजपचं हे दुटप्पी वागणे
माहुल पम्पिंग स्टेशन ही मुंबईची गरज आहे. हा प्रकल्प कार्यान्वित झाल्यास हिंदमाता पासून तुंबणाऱ्या पाण्याचा निचरा होणार आहे. कोणताही प्रस्ताव प्रशासन घेऊन येते. प्रशासनाने हा प्रस्ताव सुधार समितीसमोर आणला तेव्हा भाजपच्या नगरसेवकांनी त्याला मान्यता दिली. ( Mumbai Municipal Corporation ) सुधार समितीत एकमताने हा प्रस्ताव संमत झाला. मात्र सभागृहात भाजपची भूमिका अचानक बदलली. ती का आणि कशी बदलली, कुणामुळे बदलली ? भाजपचं हे दुटप्पी वागणे किती गांभीर्याने घ्यायचे ? असा प्रश्नही जाधव यांनी उपस्थित केला आहे.
प्रशासनविरोधात कोर्टात का जात नाही
भाजपा उठसूठ स्थायी समिती अध्यक्षांवर बदनामीकारक आरोप करते. कोणत्या ना कोणत्या कारणाने कोर्टात त्यांच्यावर केस करते. अर्थात तिथे देखील भाजप तोंडघशी पडतेच. मग कॉन्ट्रॅक्ट चुकीचे असेल तर प्रशासनविरोधात कोर्टात का जात नाही, ह्याचे उत्तर शेलार देतील का?, असा सवालही शिवसेनेने केला आहे. शेलार यांची आजची पत्रकार परिषद शिवसेनेच्या द्वेषाने ठासून भरली होती. कितीही प्रयत्न केले तरी पालिका निवडणुकीत विजय होणार नाही, हे लक्षात आल्याने त्यांच्या पायाखालची वाळू घसरू लागली आहे. त्या नैराश्यातून आशिष शेलार आणि भाजपचे नेते भलते सलते आरोप करीत आहेत. एकामागून एक खोटे आरोप करायचे, रोज सगळ्या नेत्यांकडून चार चार पत्रकार परिषदा घ्यायच्या हाच भाजपच्या नेत्यांचा एकमेव उद्योग आहे असा टोला जाधव यांनी लगावला आहे. निवडणुका पाहून भाजपने इतक्या खालच्या पातळीवर येऊ नये असेही जाधव यांनी म्हटले आहे.
हेही वाचा -Omicron in Dombivali : सौम्यलक्षणे असलेला ओमायक्रॉनचा रुग्ण डोंबिवलीत आढळला... ६ जण संशयित