मुंबई- विधानसभा निवडणुकीला अवघे काही दिवसच शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे प्रत्येक राजकीय पक्षांनी प्रचाराचा सपाटा लावला आहे. आरोप प्रत्यारोपाने वातावरण अगदी ढवळून निघाले आहे. या निवडणुकीत अनेक तरुण चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे. यात असे काही तरुण चेहरे आहेत ज्यांना राजकीय वारसा लाभला असून ते आता पहिल्यांदाच विधानसभेच्या आखाड्यात उतरले आहेत. यात युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे, शरद पवारांचा नातू रोहित पवार, एकनाथ खडसेंच्या कन्या रोहिणी खडसे, खासदार सुनील तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे, सतेज पाटलांचे पुतणे ऋतुराज पाटील यांचा यात समावेश आहे.
हेही वाचा - शेवटी व्हायचं तेच झालं! भाजप-सेना युती तुटली? आता आमने-सामने लढाई
आदित्य ठाकरे -
ठाकरे घराण्यातील आदित्य ठाकरे हे पहिले सदस्य आहेत, जे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. याआधी ठाकरे कुटुंबातील कोणीही निवडणूक लढवली नव्हती. त्यामुळे या निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
आदित्य ठाकरे यांनी विजय संकल्प सभेत 'हिच ती वेळ' म्हणत विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे जाहीर केले होते. आदित्य हे मुंबईतील वरळी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यामुळे ठाकरे घराण्यातील तिसरी पिढीही आता मुख्य राजकारणात उतरली आहे.
2010 मधील दसरा मेळाव्यात बाळासाहेब ठाकरेंनी युवासेनेची घोषणा केली आणि नातू आदित्य ठाकरेंकडे या नव्या सेनेची जबाबदारी सोपवली होती. तेव्हापासून आदित्य ठाकरेंनी राजकारणाचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. आता सध्या आदित्य हे शिवसेनेचे नेते आहेत.
रोहित पवार -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार कुटुंबातील चौथ्या पिढीने राजकारणात प्रवेश केला आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे पुतणे रोहित पवार देखील विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. रोहित पवार हे अहमदनगर जिल्ह्यतील कर्जत-जामखेड मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. याआधी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांनी लोकसभा निवडणूक लढवली होती. मात्र, त्यांना तिथे पराभवाचा धक्का बसला होता. त्यानंतर आता रोहित पवार विधानसभेच्या रिंगणात उतरले आहेत.
कर्जत-जामखेड हा मतदारसंघ तसा भाजपचा किल्ला मानला जातो. तिथे भाजपचे मंत्री राम शिंदे हे सध्या प्रतिनिधीत्व करतात. रोहित पवार हे जिल्हा परिषद सदस्य आहेत. मागील जवळपास तीन वर्षापासून रोहित हे मतदारसंघात जोडणी करत आहेत. 'बारामती अॅग्रो' च्या माध्यमातून रोहित पवार हे तरुणांच्या नेहमीच संपर्कात राहतात. कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातूनदेखील ते नेहमीच शेतकऱ्यांच्या मनात घर करून आहेत. या दुष्काळी परिस्थिती रोहित पवार यांनी स्वत: शरद पवार यांच्यासोबत अनेक दौरे केले आहेत. अनेक अंगांनी परिचित असलेल्या रोहित पवार यांच्या या पहिल्या विधानसभा निवडणुकीकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
रोहिणी खडसे -